शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

के/ईस्ट वॉर्ड - दावेदारांसह उत्सुकांची चाचपणी सुरू

By admin | Published: January 30, 2017 9:56 PM

नव्या प्रभाग रचनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे

टीम लोकमत : मुंबईनव्या प्रभाग रचनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. युतीबाबत अद्यापही संभ्रम असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतंत्ररीत्या लढण्याची तयारी दर्शवली आहे. विशेषत: दावेदारांसह उत्सुक उमेदवारांमध्येही आघाडी आणि युतीबाबत नाराजी असल्याने प्रत्येकानेच वेगळी चूल मांडण्याबाबतचे संकेत दिले आहेत. मुंबईच्या उपनगरात अशीच काहीशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘के-ईस्ट’ वॉर्डमध्येही राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू झाली आहे.‘के-ईस्ट’ वॉर्डमध्ये नव्या प्रभाग रचनेनुसार १५ प्रभाग निर्माण झाले आहेत, तर गतवर्षीही या वॉर्डमध्ये पंधराच प्रभाग होते. परिणामी प्रभागांची संख्या कमीअधिक झाली नसली तरी प्रभागांच्या सीमांमध्ये फेरबदल झाले आहेत. या कारणास्तव विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे. या वॉर्डात खुल्या गटातील महिलांसाठी पाच प्रभाग आरक्षित आहेत. तीन प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असून, एक प्रभाग इतर मागासवर्गीय (महिला) म्हणून आरक्षित आहे. उर्वरित प्रभाग खुले असल्याने उमेदवारांसह दावेदारांमध्ये चुरस रंगली आहे.‘के-ईस्ट’ वॉर्डमध्ये मजास, मरोळ, सीप्झ, गुंदवली, एमआयडीसी, जे.बी. नगर, कोलडोंगरी आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या वॉर्डातील अनेक नागरी प्रश्न पूर्णत: सोडवण्यात आलेले नाहीत. परिणामी याच नागरी प्रश्नांचे भांडवल नवे उमेदवार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे या वॉर्डात अनंत नर, केसरबेन पटेल, विनी डिसुझा, ज्योती अळवणी असे दिग्गज नगरसेवक आहेत. यांच्या खेळीकडेही विरोधकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच इतर वॉर्डप्रमाणे येथेही राजकीय पक्षांकडून दावेदारांसह उत्सुकांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, निवडणुकीच्या धुमाळीत उत्तरोत्तर यात भरच पडणार आहे. ............................................................प्रभाग क्रमांक ७२एकूण लोकसंख्या ५९०५५अनुसूचित जाती १६६६अनुसूचित जमाती ३५५प्रभागाची व्याप्ती : इस्माईल युसूफ कॉलेज, नटवरनगर, बांद्रेकरवाडी, लक्ष्मीनगर............................................................प्रभाग क्रमांक ७३एकूण लोकसंख्या ५४२१०अनुसूचित जाती २५३०अनुसूचित जमाती १८७प्रभागाची व्याप्ती : श्यामनगर, मजास बस डेपो, जोगेश्वरी गुंफा, जनता कॉलनी............................................................प्रभाग क्रमांक ७४एकूण लोकसंख्या ५१२९२अनुसूचित जाती १६६३अनुसूचित जमाती ५०५प्रभागाची व्याप्ती : दुर्गानगर, रूपनगर, गणेशनगर, कमाल अमरोही स्टुडिओ............................................................प्रभाग क्रमांक ७५एकूण लोकसंख्या ५४३९९अनुसूचित जाती २५७३अनुसूचित जमाती ८३७प्रभागाची व्याप्ती : सेव्हन हिल्स रुग्णालय, मरोळ बस डेपो, कदमवाडी, मरोळ, विजयनगर............................................................प्रभाग क्रमांक ७६एकूण लोकसंख्या ५४७०७अनुसूचित जाती ४२३२अनुसूचित जमाती ८६४प्रभागाची व्याप्ती : देवल तलाव, सीप्झ, सुभाषनगर, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट, महाकाली गुंफा............................................................प्रभाग क्रमांक ७७एकूण लोकसंख्या ५३०४७अनुसूचित जाती २२७२अनुसूचित जमाती ४२५प्रभागाची व्याप्ती : इन्कम टॅक्स कॉलनी, मेघवाडी, इंदिरानगर, कोकणनगर............................................................प्रभाग क्रमांक ७८एकूण लोकसंख्या ५१४९९अनुसूचित जाती ३४६अनुसूचित जमाती २१३प्रभागाची व्याप्ती : वांद्रे प्लॉट, झुला मैदान, शिवाजीनगर............................................................प्रभाग क्रमांक ७९एकूण लोकसंख्या ५६६४२अनुसूचित जाती ९६१अनुसूचित जमाती ५६०प्रभागाची व्याप्ती : शंकरवाडी, होली स्पिरिट रुग्णालय, तोलानी कॉलेज............................................................प्रभाग क्रमांक ८०एकूण लोकसंख्या ५६१४८अनुसूचित जाती १४५४अनुसूचित जमाती ४७७प्रभागाची व्याप्ती : एम.व्ही. कॉलेज, पारशी कॉलनी, आझादनगर, बिमानगर............................................................प्रभाग क्रमांक ८१एकूण लोकसंख्या ४९३३४अनुसूचित जाती २११३अनुसूचित जमाती ६१९प्रभागाची व्याप्ती : शेर-ए-पंजाब कॉलनी, गुंदवली, एमआयडीसी, मरोळ बस डेपो, हनुमान नगर............................................................प्रभाग क्रमांक ८२एकूण लोकसंख्या ५१५३४अनुसूचित जाती ३२१४अनुसूचित जमाती ३८२प्रभागाची व्याप्ती : जे.बी. नगर, अशोकनगर, रामलीला मैदान, साईनगर, ए.ए. कॉलनी............................................................प्रभाग क्रमांक ८३एकूण लोकसंख्या ५४४१७अनुसूचित जाती ५०६५अनुसूचित जमाती ४१६प्रभागाची व्याप्ती : आंबेडकरनगर, बामणवाडा, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, ए.ए. कॉलनी............................................................प्रभाग क्रमांक ८४एकूण लोकसंख्या ५९७५५अनुसूचित जाती ९५२अनुसूचित जमाती ६०६प्रभागाची व्याप्ती : कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाषनगर............................................................प्रभाग क्रमांक ८५एकूण लोकसंख्या ६०१२७अनुसूचित जाती २५१४अनुसूचित जमाती ३३२प्रभागाची व्याप्ती : डहाणूकर कॉलेज, शास्त्रीनगर, विलेपार्ले पोलीस स्टेशन............................................................प्रभाग क्रमांक ८६एकूण लोकसंख्या ५७७२४अनुसूचित जाती २२०९अनुसूचित जमाती ८३९प्रभागाची व्याप्ती : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार व्हिलेज, चिमटपाडा..................................................................................................२०१२ साली के/ईस्ट वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारप्राप्त मतेपराभूत उमेदवारप्राप्त मते६६उज्ज्वला मोडक, भाजपा८१५९राजेश हेगडे, काँग्रेस५१५१६७मंजिरी परब, सेना१३२००मीना सलीन, मनसे८८९६६८अनंत नर, सेना१४२६७विलास मेहेतर, मनसे६९९६६९शिवानी परब, सेना११०००नम्रता परब, मनसे६६१७७०भालचंद्र अंबुरे, मनसे५०६७इनायत शेख, काँग्रेस३९८५७१संध्या यादव, सेना९१२३सुषमा देसाई, मनसे८०६४७२सुनीता इलवडेकर, सेना९२३४ज्योती बिर्जे, एनसीपी४५५१७३केसरबेन पटेल, काँग्रेस१०८९१स्नेहलता वारेकर, मनसे३३५२७४प्रमोद सांवत, सेना९८४६सुधीर कावा, काँग्रेस७७८५७५सुषमा राय, काँग्रेस६६१३प्रणाली वेदक, सेना४९६९७६स्मिता सावंत, सेना९२७८जगदीश्वरी अमीन, काँग्रेस ८५३९७७विनी डिसुझा, काँग्र्रेस५९३२रिद्धी धुरी, सेना५७०७७८मनीषा पांचाळ, सेना८३०४सुनीता पारकर, मनसे६२८०७९सुभाष पाटकर, सेना१०२४९वीणा भागवत, मनसे८७२३८०ज्योती अळवणी, अपक्ष८४७७सोनाली भाटवडेकर, मनसे ४६९३..................................................................................................