पुणो : उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्यासाठी आजपासून ग्रामस्थांनी आंदोलन आणखी तीव्र केले आहे. शहराच्या चारही दिशांना जोर्पयत कचरा डेपो सुरू केले जात नाहीत, तोर्पयत बेमुदत आंदोलन करण्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने आता या प्रश्नात मध्यस्थी करण्यासाठी महापालिका, तसेच जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर चंचला कोद्रे यांनी आज दिली. कचरा समस्या सोडविण्यासाठी आज महापालिका प्रशासन तसेच पालिकेच्या पक्षनेत्यांनी शहरातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलाविली होती.
कचरा डेपो विरोधात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या काही पदाधिका:यांनी शहरातून येणा:या कचरा गाडय़ा अडविण्यास सुरुवात केली आहे. तर हा डेपो कायमस्वरूपी बंद करून शहराच्या चारही दिशांना शास्त्रीय पद्धतीने कचरा कँपिंग प्रकल्प करावे, अशी मागणी करीत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनीही आजपासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन तीव्र झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात अडीच हजार टन कचरा पडून असल्याने आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेस हव्या असलेल्या जागा शासनाने तत्काळ उपलब्ध कराव्यात, यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, या बैठकीत जागांवर चर्चा तसेच आंदोलन मागे घेण्यासाठी विनंतीऐवजी उपस्थितांनी पालिका प्रशासनावरच आगपाखड केली. दोन तास चाललेली बैठकीत तोडग्याविनाच संपली. अखेर तोडग्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रभारी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आमदार विनायक निम्हण, दीप्ती चवधरी, बापूसाहेब पठारे, विजय शिवतारे, अनिल भोसले, सभागृहनेते सुभाष जगताप, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपा गटनेते गणोश बिडकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, घनकचरा विभाग प्रमुख सुरेश जगताप या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. त्यांचा विरोध साहजिकच अपरिहार्यतेमधून आला आहे. पण, महापालिकाही या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तरीही त्यास काही कालावधी जाणार असल्याने तोर्पयत ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापौर चंचला कोद्रे यांनी केला आहे. तसेच, आज झालेल्या बैठकीत ग्रामस्थांच्या मागणीनुसार शहराच्या परिसरात इतर ठिकाणी शास्त्रीय लँडफिलिंग करण्यासाठी दोन खाणी उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रश्नी उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन पर्यायी जागांसाठी तोडगा काढला जाईल.
नवीन कचरा डेपो होईर्पयत माघार नाही : शिवतारे
ज्याप्रमाणो उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकला जातो, त्याप्रमाणोच शहराच्या चार दिशांना शास्त्रीय पद्धतीने कचरा जमिनीत जिरविला जावा. यासाठी बंद पडलेल्या खाणी, शासकीय जागा, तसेच वनजमिनीची मोठी जागा आहे. ही उपलब्ध करून घेण्यास शासनास अवघा चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे नवीन ठिकाणी कचरा जाईर्पयत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आमदार शिवतारे यांनी सांगितले. उद्या होणा:या बैठकीत ज्या ठिकाणचे ग्रामस्थ, तसेच लोकप्रतिनिधी यांनाही मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवावे, अशी मागणी शिवतारे यांनी केली आहे.
कचरा एकाच ठिकाणी न टाकता तो शहराच्या चार दिशांना विक्रेंदीकरण पद्धतीने प्रक्रियेसाठी पाठविला जावा, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. त्यानुसार जागांच्या उपलब्धतेनुसार, जिल्हा प्रशासन पर्यायांची चाचपणी करत आहे. प्रशासनाकडील 85 खाणीपैकी केवळ 5 खाणी शासकीय मालकीच्या आहेत. मात्र, त्या एअरफोर्सच्या परिसरात असल्याने त्या ठिकाणी परवानगी मिळण्याबाबत अडचणी आहेत. त्यामुळे इतरत्र कचरा हालविताना ग्रामस्थांचा विरोध होऊ नये म्हणून स्थानिक प्रतिनिधी तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पावले उचलली जातील.
-सौरभ राव, जिल्हाधिकारी
असाही ‘स्मार्ट’पणा
पुणो : कच:याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शहरातील आमदार व गटनेत्यांना बोलाविण्यात आले. त्याचवेळी अचानकपणो पुणो शहराचा समावेश केंद्र शासनाच्या 1क्क् स्मार्ट सिटीत करण्याबाबत सादरीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कचरा बंद आंदोलनांवर तोडगा काढण्यासाठी शहरातील आमदार, पालिकेतील पदाधिकारी व अधिका:यांची बैठक सभागृहात दुपारी बोलाविण्यात आली. मात्र स्मार्ट सिटीबाबत माहितीचे सादरीकरण अॅमेनोरा पार्कचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी केल्यामुळे पालिकेतील काही पदाधिकारी व नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार टाकून नाराजी व्यक्त केली.