शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

कचराकोंडीने सत्ताधारी फैलावर

By admin | Published: May 04, 2017 2:57 AM

उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद व्हावा, या करिता भर उन्हात दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी बुधवारी कचरा

फुरसुंगी : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद व्हावा, या करिता भर उन्हात दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी बुधवारी कचरा डेपोची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. वेगवेगळे आंदोलन करून कचराप्रश्नी ग्रामस्थ महापालिकेचे लक्ष वेधत आहेत.सकाळी अकराच्या सुमारास मंतरवाडी चौकापासून प्रतीकात्मक अंत्ययात्रेस सुरुवात झाली. कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांच्यासह काही ग्रामस्थ रामनामाचा गजर करीत टाळ वाजवित होते. कचरा डेपो कायमस्वरूपी बंद झालाच पाहिजे, पालिका प्रशासन व राज्य शासनाचा निषेध असो, अशा घोषणा देत मंतरवाडी चौकातून अंत्ययात्रा कचरा डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली. पालिकेचा निषेध म्हणून संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी या ठिकाणी मुंडण करून घेतले. या अंत्ययात्रेमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंंदर कामठे, राहुल शेवाळे, तात्या भाडळे, विजय भाडळे, अर्चना कामठे, अजिंंक्य घुले, रोहिनी राऊत, अनिल टिळेकर तसेच दोन्ही गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. १४ एप्रिलला कचरा डेपोला आग लागल्यानंतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरागाड्या शहरात परत पाठवून आंदोलनास सुरुवात केली. ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी पालिकेच्या शिष्टमंडळ तीन ते चार वेळा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या भेटीला आले. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या चर्चा निष्फळ ठरल्या. उलटपक्षी ग्रामस्थांनी भजन, जागरण गोंधळ, अर्धनग्न, घंटानाद आंदोलनांच्या माध्यमातून आपला निर्धार ठाम ठेवला आहे.  फुरसुंगी कचराडेपोला आग लागल्यानंतर पालकमंत्री या ठिकाणी एकदाही फिरकले नाही. महापौर तर सध्या परदेश दौऱ्यावर गेल्या आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असताना यांचे परदेश दौरे होत म्हणजेच यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीच देणे-घेणे नाही.- सुप्रिया सुळे, खासदारआज अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून आंदोलनकर्ते दहा दिवस या प्रतीकात्मक मृत्यूचे सूतक पाळणार असून या दरम्यान कचराडेपोबाबत कोणाशीही कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाहीत.- तात्या भाडळे

 

सेना नेत्यांचे उद्धव ठाकरे यांना साकडेपुणे : कचऱ्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या महापालिकेतील नगरसेवकांनी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही, अशी तक्रार त्यांनी केली. अठरा दिवस झाले मात्र विषय अद्याप आहे तसाच आहे. पुण्याची स्थिती अवघड होत चालली असून आता तुम्हीच यातून पुणेकरांना सोडवा, असे साकडे त्यांनी ठाकरे यांना घातले. ठाकरे यांनी त्याची दखल घेत राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क करीत त्यांना मुख्यमंत्र्यांची या विषयावर त्वरित भेट घ्यावी, असे सांगितले. महापौरांच्या घरासमोरच आंदोलकांनी टाकला कचरापुणे : कचऱ्याची समस्या आता चिघळत चालली आहे. मनसेच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानासमोर कचरा टाकून आंदोलन झाले, काँग्रेसने महापालिका प्रवेशद्वारावर कचरा टाकून सत्ताधारी भाजपाचा निषेध केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात कचरा टाकणाऱ्यावरून झालेल्या एका खून प्रकरणाचा संदर्भ घेत पदाधिकारी आता आणखी बळी जाण्याची वाट पाहात आहे का, अशी घणाघाती टीका केली. शिवसेनेने या आंदोलनात सहभागी न होता मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे धाव घेत त्यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. महापौर, पालकमंत्री यांच्या परदेशवारीबरोबर बुधवारी आयुक्त कुणाल कुमार हेही मुंबईला गेल्यामुळे आंदोलकांची साधी भेटही कोणी घेतली नाही. त्याचाही निषेध करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे गुरूवारी महापालिकेत येऊन आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेणार असल्याची माहिती महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, रूपाली पाटील-ठोंबरे आदींनी महापौर मुक्ता टिळक यांच्या नारायणपेठ येथील निवासस्थानी कचरा फेकून आंदोलन केले. काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काँग्रेस भवन ते महापालिका असा मोर्चा काढून भाजपाचा निषेध केला. अरविंद शिंदे, नगरसेवक अजीत दरेकर, रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे, सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)