शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

कल्याणमधील आजदे गावातील तलावात यंदा गणेशमूर्तींचं विसर्जन नाही करता येणार, स्थानिकांच्या तक्रारीनंतर केडीएमसीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 1:05 PM

यंदा मिलाप नगर निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार नाहीय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं तसा निर्णय घेत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.  

डोंबिवली, दि. 23 - यंदा मिलाप नगर निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार नाहीय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं तसा निर्णय घेत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.  मिलाप नगर (आजदे गाव) निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात दरवर्षी मोठया प्रमाणावर गणेशमूर्ती, दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन होत असते. यामुळे होणा-या प्रदुषणामुळे मिलाप नगर रहिवाशी संघाने हरित लवादाकडे धाव घेतली होती. स्थानिकांच्या तक्रारी दखल हरित लवादानं घेतली आहे. महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (कल्‍याण) यांनीही मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या आहेत. त्‍यामुळे आजदे गावातील तलावात यावर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नसल्याचा निर्णय केडीएमसीने घेतला असून तसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी केले आहे.

दरम्यान, पर्यायी व्‍यवस्‍था म्‍हणून महापालिकेतर्फे अभिनव शाळेच्‍या निवासी विभागातील यश जिमखानामागील मोकळ्या जागेत कृत्रिम तलावाची निर्मिती करण्‍यात आलेली आहे. स्‍थानिक रहिवाशी, सार्वजनिक गणेश उत्‍सव मंडळ व सन्‍मानिय पालिका सदस्‍यांनी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ई प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव