शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

कल्पना सरोज, मानबी बंडोपाध्याय साधणार संवाद

By admin | Published: November 20, 2015 1:20 AM

महिला सक्षमीकरणाची चळवळ बळकट करतानाच महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज देशभरातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कलर्स व्हायकॉम १८ प्रस्तुत ‘लोकमत वुमन समिट

पुणे : महिला सक्षमीकरणाची चळवळ बळकट करतानाच महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज देशभरातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कलर्स व्हायकॉम १८ प्रस्तुत ‘लोकमत वुमन समिट २०१५’ एनईसीसीच्या सहयोगाने ‘लोकमत वुमन समिट’ हे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. संपूर्ण देशातील विविध क्षेत्रांतील महिलांकडून या चळवळीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गेली चार वर्षे सातत्याने विविध राष्ट्रीय पातळीवरील महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला या राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. अधिक माहितीसाठी वाचत रहा लोकमत.डॉ. मानबी बंडोपाध्याय : डॉ. मानबी बंडोपाध्याय या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्या भारतातील पहिल्या तृतीयपंथी प्राचार्य ठरल्या आहेत. त्यांनी बंगाली साहित्यामध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली आहे. याआधी त्यांनी विवेकानंद सतोवार्षिकी महाविद्यालयात बांगला भाषेच्या सहायक प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. ‘ट्रान्सजेंडर लिटरेचर’ या विषयामधील पीएच.डी. मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी आहेत. ‘ओबो मानब’ हे तृतीयपंथींवरील पहिले मासिक बंडोपाध्याय यांनी प्रकाशित केले. बंडोपाध्याय यांनी २००३मध्ये नाव आणि लिंग बदलाचा निर्णय घेतला. त्यांची बंगाली भाषेतील ‘ओंतोहिन ओंतोरिन प्रोसितोवहोर्तिका’ (एंडलेस बाँडेज) ही कादंबरी सर्वाधिक खपाची ठरली. ‘थर्ड जेंडर इन बंगाली लिटरेचर’ या पुस्तकाच्याही मानबी बंडोपाध्याय या लेखक आहेत.जेसी पॉल : जेसी पॉल या पॉल रायटर या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. आयआयएममधून एमबीएचे शिक्षण घेतलेल्या पॉल मार्केटिंग क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्या इन्फोसिस कंपनीच्या जागतिक पातळीवरील ब्रँड व्यवस्थापक होत्या. विप्रो कंपनीच्या मुख्य विपणन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे ‘नो मनी मार्केटिंग’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. भारतातील मार्केटिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या हेतूने जेसी पॉल यांनी २०१०मध्ये पॉल रायटरची स्थापना केली. ही कंपनी सल्लागार सेवा, कार्यक्रम व्यवस्थापन प्रकल्प असे अनेक उपक्रम राबवते. पॉल या एसएसक्यू इंडिया बीएफएसएल लिमिटेडच्या संचालिका म्हणूनही काम पाहतात.कल्पना सरोज : कल्पना सरोज या कमानी ट्यूब्ज लिमिटेड या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्यांना २०१३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये जन्मलेल्या कल्पना सरोज यांचे जीवन हे अनेक खाच-खळगे आणि आडवळणांनी भरलेले आहे. बालवधू ते एका कंपनीच्या संचालिका असा त्यांचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. वैैयक्तिक आणि कौैटुंबिक अडचणींवर मात करीत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. कल्पना सरोज ग्रुप आॅफ कंपनीच अंतर्गत सध्या कल्पना या १० कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतात. याआधी त्यांनी राष्ट्रीय एकता युवा मंच, सुशिक्षित बेरोजगार मंडळ अशा सामाजिक संस्थांचे, तसेच कल्पना सरोज विधी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैैक्षणिक संस्थांचे अध्यक्षपद भूषवले आहे. सरोज यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक बौैद्ध परिषदांचे आयोजन केले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि उन्नतीसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार, राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार, लंडनचा महापौैर पुरस्कार, समता पर्व, कल्याण मित्र असे अनेक सन्मान लाभले आहेत. सध्या त्यांनी आॅक्सफर्ड सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीजसह नवीन सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. सामाजिक कार्याच्या चळवळीसाठी त्यांनी २१हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत.