- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवलीचीस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये निवड झाली. मात्र या प्रकल्पांतर्गत आजतागायत एकाही कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. दोन वर्षांत केवळ कार्यालय स्थापन करणे, कर्मचाऱ्यांची नेमणूक, विविध विभागांशी समन्वय साधून परवानगी मिळवणे आणि निविदा प्रक्रिया एवढेच झाले आहे. पुढच्या सहा महिन्यांत काही कामांना सुरुवात होईल, असा दावा प्रशासनाने केला असला तरी २०१९ पूर्वी त्या कामांचे श्रीफळ वाढवले जाण्याबाबत साशंकता आहे.महापालिका निवडणुकीत अधिकारी व्यग्र असल्याने २०१५ साली पहिल्या फेरीत शहराची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाली नाही. प्रकल्प अहवाल तयार करण्यात काही त्रुटी राहिल्या होत्या. दुसºया फेरीत कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली. योजनेच्या नियमानुसार सल्लागार कंपनी नेमून स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यात आली. महापालिकेस दरवर्षी २०० कोटी यानुसार पाच वर्षांत एक हजार कोटी रुपये निधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी दरवर्षी महापालिकेने ५० कोटी रुपयांची पत दाखवणे आवश्यक आहे. महापालिकेने सुरुवातीला एक हजार ४०० कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला होता. त्यानंतर हाच खर्च दुसºया फेरीच्या वेळी दोन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्यात कपात करुन एक हजार ४०० कोटी रुपयांवर प्रकल्प खर्च निश्चित करण्यात आला. महापालिकेस आतापर्यंत सरकारकडून ३०० कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे.सिटी पार्क रखडलाआयुक्त पी. वेलरासू यांच्या कारकिर्दीत यादीतील ३ प्रकल्प कमी करुन प्रकल्पांची यादी २५ वर आणली गेली. त्यामध्ये महापालिका हद्दीत सिटी पार्क उभारण्याचा प्रकल्प उभारु शकत नाही, असे स्पष्ट झाले.सीसीटीव्ही बसविणे व फायबर आॅप्टिक केबल टाकण्याची कामे राज्य सरकारने ताब्यात घेतली असून त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. पाचशे एकरात ग्रीन फिल्ड विकास योजना करण्याचा मानस होता; मात्र महपाालिकेचा अंशत: आराखडा मंजूर असून त्याची अधिसूचना निघालेली नाही.स्मार्ट सिटीसाठी नेमलेल्या पहिल्या कंपनीकडून संथ गतीने काम केले जात होते. त्यामुळे दुसरी सल्लागार कंपनी नेमली. कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसर, खाडी किनारा व सिटी पार्कचे काम लवकरच सुरू होईल.- विनिता राणे, महापौर
कल्याण-डोंबिवलीत अजून श्रीगणेशा नाही! पहिल्या फेरीत शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 1:23 AM