शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

कल्याण: ‘डम्पिंग’मुले युवकाचे लग्न मोडले

By admin | Published: June 11, 2016 3:44 AM

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या विवाहोत्सुक मुलांची लग्ने दुर्गंधी, धूर आणि कोंडणारा श्वास यामुळे मोडत आहेत

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या विवाहोत्सुक मुलांची लग्ने दुर्गंधी, धूर आणि कोंडणारा श्वास यामुळे मोडत आहेत, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. आम्हाला मुलगा पसंत आहे, पण तुम्ही आधारवाडीच्या जवळचे घर बदलायला तयार असाल तर आम्ही मुलगी देऊ, असे चक्क मुलींचे वडील आणि मुली सांगू लागल्याने या परिसरात राहणारी तरुण मुले हवालदिल झाली आहेत.डम्पिंगजवळील इमारतींत राहणाऱ्या व स्वत: पौरोहित्य करणाऱ्या अमोल जोशी यांना हा अनुभव आला आहे. या परिसरातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेतली. त्यावेळी आधारवाडी परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होतो. सतत आग लागण्याच्या घटना घडल्याने धुरामुळे त्यांचे डोळे चुरचुरतात, त्यांना श्वसनाचे विकार जडले आहेत, अशा तक्रारी करतानाच या भागातील उपवर मुलांची लग्ने जमत नसल्याची बाबही पुढे आली. जोशी हे ‘नीळकंठधारा’ इमारतीत राहतात. त्यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे घरात अमोल व त्याचे वृद्ध वडील राहतात. मुलाचे दोनाचे चार हात करण्यासाठी वडिलांनी मुलगी पाहण्यास सुरुवात केली. मुलीच्या घरच्या मंडळींनी अमोलची चौकशी केली. लग्न जमण्याच्या बेतात होते. मात्र, त्याला अडसर आला तो आधारवाडी डम्पिंगचा. अमोलला आपली मुलगी दिल्यास तिला उर्वरित आयुष्य दुर्गंधी, धूर याचा जाच सहन करत काढावे लागणार, याची जाणीव झाल्याने त्या मुलीने व तिच्या आईवडिलांनी चक्क नकार कळवला. नकाराचे कारण ऐकून अमोल व त्याच्या वडिलांना धक्काच बसला. मात्र, नंतर चौकशी केली असता असा नकार मिळणारा काही तो एकटा नाही. आधारवाडी डम्पिंगच्या जवळ राहणारा मुलगा करायला अनेक वधू सर्रास नकार देत आहेत.अमोलने सांगितले की, मी पौरोहित्य करून चरितार्थ चालवतो. वडिलांनी घर घेतले होते. आता लग्नासाठी नकार आल्याने लागलीच नवे घर घेणे कसे शक्य आहे. कल्याणमध्ये ५० ते ६० लाखांच्या घरात फ्लॅटच्या किमती आहेत. त्यामुळे तूर्तास लग्नाचा विचार सोडला आहे. अमोलचे जमत आलेले लग्न तुटल्याने सोसायटीत राहणाऱ्या अन्य मुलांवर हेच संकट येऊ नये, याकरिता महिला व पुरुषांनी पुढाकार घेऊन महापौरांची भेट घेतली. त्यामध्ये नेहा रानडे, शलाका दळवी, सुनंदा शेटे, रश्मी बिरवाडकर यांच्यासह योगेश ठाकरे, प्रकाश बोरोले यांचा समावेश होता. स्थानिक नगरसेवक मोहन उगले हेही डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सुनंदा शेटे यांनी सांगितले की, त्या सहा वर्षांपासून ‘नीळकंठधारा’ सोसायटीत राहतात. इतकी तीव्र दुर्गंधी येते की, गेल्या काही वर्षांत दुर्गंधीमुळे त्यांचे जेवण जाण्याचे प्रमाण घटले आहे. आमच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला आपोआप आग लागत नाही तर लावली जाते. हे त्यांनी डोळ्यांदेखत पाहिले आहे, असे त्यांनी महापौरांना सांगितले.रश्मी बिरवाडकर यांनी सांगितले की, त्या या परिसरात २० वर्षांपासून राहत आहे. ज्यावेळी घर घेतले तेव्हा डम्पिंगचा त्रास इतका नव्हता. डम्पिंग ग्राउंड बंद होणार, हे गेली कित्येक वर्षे आम्ही ऐकतो आहोत. आमचे सगळे आयुष्यच दुर्गंधी आणि धुराच्या लोटात जाणार की काय, असा आर्त सवाल त्यांनी केला.नेहा रानडे या १६ वर्षांपासून तेथे राहत आहेत. त्यांनी सांगितले की, आमच्या मुलांची लग्ने मोडू लागली. पूर्वी मुली निमूटपणे दिल्या घरी जात होत्या. आता त्या शिकल्यासवरल्या. त्यांना त्यांचे हित कळते. (प्रतिनिधी)फडणवीसांना दाखवणार काळे झेंडेयेत्या १७ जून रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘स्मार्ट सिटी शिखर परिषदे’चेआयोजन केले आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी आधारवाडी परिसरातील रहिवासी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला.डम्पिंगच्या प्रश्नावर महासभेत नेहमीच मी आवाज उठवतो. डम्पिंग ग्राउंड हटवणार, असे आश्वासन मी रहिवाशांना कधीच दिले नव्हते. हा मोठा प्रश्न आहे. तो एक-दोन दिवसांत चुटकीसरशी सुटणार नाही. मी नागरिकांच्या बाजूनेच आहे.मोहन उगले, स्थानिक नगरसेवककाळे झेंडे दुकानात लगेच मिळतात. मात्र, ते दाखवून प्रश्न सुटत नाही. महापालिकेकडून डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हा प्रश्न रखडला होता. आता राज्यात आणि महापालिकेत युतीची सत्ता असल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल. -राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली