कल्याण : बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ज्यांचे भाषण कारणीभूत असल्याचा संशय आहे, त्या डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाचा प्रचार-प्रसार केल्याप्रकरणी ठाण्यातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी कल्याणमधील एका तरुणाची चौकशी केली. झाकीर यांच्या भाषणाने प्रेरित होऊन अनेक तरुण इसिस या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित होत असल्याचा संशय आहे. असाच कल्याणचा एक तरु ण या संघटनेच्या संपर्कात आल्याचा संशय असल्याने ही चौकशी केल्याचे सांगितले जाते. ठाणे एटीएसने गुरुवारी सायंकाळी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, या चौकशीतून फारसे काही निष्पन्न न झाल्याने त्याला नंतर सोडून देण्यात आले. एटीएसने या कारवाईबाबत गुप्तता पाळल्याने तरुणाचे नाव समजू शकलेले नाही. बाजारपेठ पोलिसांना या कारवाईची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)>संघटनांशी संपर्काची केली चौकशीआरोपीची काही तास कसून चौकशी करण्यात आली. त्या तरु णाचे दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का, सोशल मीडिया अथवा इंटरनेटद्वारे तो कोणत्या संघटनेशी किंवा सदस्यांशी संपर्क साधत होता का, तसेच डॉ. नाईक यांच्या भाषणामुळे प्रेरित होऊन तो अनुचित प्रकार करणार नाही ना, अशा सर्व बाजूंनी एटीएसने त्याची सखोल चौकशी केल्याचे सांगितले जाते. बाजारपेठ पोलिसांना या कारवाईची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
कल्याणच्या तरुणाची एटीएसकडून चौकशी
By admin | Published: July 22, 2016 3:52 AM