शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

‘कमळा’ची कमाल!

By admin | Published: February 24, 2017 7:24 AM

देशभराचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदानाचा

देशभराचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदानाचा टक्का प्रथमच पन्नाशीपार गेला व ५५ टक्के मतदान झाले. या वाढीव मतदानाचा आकडा पुढे आल्यावर त्याचा भाजपाला लाभ होणार, असा अंदाज व्यक्त झाला. तो खरा ठरला. भाजपाने या वाढीव मतदानाच्या जोरावर थेट ८२ जागा मिळवल्याने आता सर्वांत मोठा पक्ष ठरूनही शिवसेनेसाठी सत्ता रथापनेचा मार्ग खडतर झाला आहे. भाजपाचा कौल निर्णायक ठरणार आहे.मुंबई : शिवसेनेसाठी अस्तित्वाची व भाजपाकरिता प्रतिष्ठेची ठरलेली मुंबई महापालिकेची लढाई यंदा आश्चर्यकारकरीत्या बरोबरीत सुटली आहे़ स्वबळावर सत्तेचा दावा करणाऱ्या शिवसेनेने मागील निवडणुकीपेक्षा एक पाऊल पुढे जात ८५ जागा मिळवल्या़ तरी शतक न मारता आल्याने शिवसेनेचा हिरमोड झाला, तर भाजपाने तब्बल तीनपट झेप थेट ८२ जागांवर मुसंडी मारत कमाल केली. या दोन्ही पक्षांच्या अटीतटीच्या लढाईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व विरोधी पक्ष अवघ्या ६० जागांवर आटोपले़ गेली २५ वर्षे शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भाजपाने ‘मिशन शंभर’ असे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेला टार्गेट केले़ विजय खेचून आणण्यासाठी भाजपाची यंत्रणाही कामाला लागली़ यामुळे या निवडणुकीत अटीतटीची झुंज झाली. मतदारांनीही गेल्या २५  वर्षांत प्रथमच सर्वाधिक ५५ टक्के  मतदान केले़ २०१२ च्या तुलनेत झालेले  हे ११ टक्के वाढीव मतदानच निर्णायक  ठरले़ २०१२ मध्ये भाजपाला ३२ जागा मिळाल्या होत्या़ या जागांमध्ये दुप्पट वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती़ आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत शिवसेनाच ९० ते १०० जागांवर आघाडीवर होती़ मात्र भाजपाने अनपेक्षित मुसंडी मारत ८२ जागांवर विजय मिळवला़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अवघ्या सात जागा मिळाल्या. तर ‘एमआयएम’ने दोन जागांवर  विजय मिळवला आहे़ (प्रतिनिधी)50 जागा भाजपाच्या वाढल्याया निवडणुकीत युती तुटल्याचा सर्वाधिक लाभ भाजपाचा झाला. तब्बल ५० जागा वाढल्याने सत्तेचा दावेदार ठरला आहे.09 जागा शिवसेनेच्या वाढल्यायुती तोडल्याचा अपेक्षित लाभ शिवसेनेला झाला नसला तरी १० जागा वाढल्याने शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला.21 जागा काँग्रेसच्या घटल्यापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची मोठी घसरण झाली.114 महानगरपालिकेतील सत्तेसाठी ११४ जागांची गरज असून हा आकडा कोण व कसा गाठणार हा प्रश्न आहे.

 

( ELECTION RESULT-शिवरायांच्या आशीर्वादाचा मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांना विसर