जमीर काझी - मुंबई
भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या म्हाडातील गैरव्यवहाराला प्रतिबंध घालण्यात गृह विभागाला गांभीर्य नसल्याचेच दिसते आहे. वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बदल्यांमध्ये मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारीपदी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून रिक्त असलेल्या दक्षता विभागाला आता विधानसभा निवडणुकीनंतरच पूर्णवेळ वाली मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
म्हाडाच्या दक्षता विभागाचे प्रमुख रामराव पवार गेल्या 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार भुवन यांच्याकडे आहे. त्यानंतर, या ठिकाणी राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिका:यांची प्रतिनियुक्ती केलेली नाही. येत्या पंधरवडय़ामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सरकारने विशेष महानिरीक्षक दर्जाच्या अधिका:यांची निवड न केल्यास नवीन सरकार स्थापन होईर्पयत ही नियुक्ती प्रलंबित राहणार आहे. शनिवारी गृह विभागाने 9क् वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बदल्या-बढत्यांचे आदेश जारी केले. मात्र, म्हाडामध्ये कोणाचीही नियुक्ती केलेली नाही.
म्हाडामध्ये दलाल व एजंटांचा राजरोसपणो सुळसुळाट सुरू असताना त्याला अटकाव करणो दूरच, उलट अधिकारी, कर्मचा:यांच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणो आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबतच्या तक्रारी विभागाकडे पडून आहेत. गेल्या महिन्यामध्ये म्हाडातील 4 लाचखोर कर्मचा:यांवर एसीबीकडून कारवाई झाल्याने या ठिकाणी चालणारा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे. गरजू नागरिकांना रास्त दरात हक्काचा निवारा मिळवून देणो, या उद्देशाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) व्याप्ती राज्यभर आहे. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक निकड असलेल्या वास्तूच्या पूर्ततेसाठी कार्यरत राहणा:या म्हाडामध्ये गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराचा वारू चौखूर उधळत आहे. गरजू नागरिकांना घर मिळवून देणो, तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकास योजना, ट्रान्ङिास्टमध्ये नंबर लावण्याच्या आमिषाने दलालांनी लुबाडणूक केली आहे. त्याला म्हाडातील काही अधिकारी, कर्मचा:यांशी हातमिळवणी करून काम करणारे ‘रॅकेट’ कार्यरत असल्याचे अनेक प्रकरणांतून चव्हाटय़ावर आले. या गैरव्यवहाराला प्रतिबंध बसण्यासाठी प्राधिकरणांतर्गत स्वतंत्र दक्षता विभाग सुरू करण्यात आला. त्यामध्ये मुख्य अधिका:यांच्या नेतृत्वाखाली दोन उपअभियंते आणि अन्य आस्थापनावर्गाचा समावेश करून त्यांच्याकडे म्हाडातील सर्व व्यवहारांची देखरेख, प्राधिकरणाच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचा:यांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन तपास, दलालांना पायबंद घालणो, विविध गृहनिर्माण योजनांमध्ये लाभाथ्र्याकडून झालेल्या फसवणुकीचा छडा लावणो, गैरव्यवहाराच्या प्रकरणात तपासाबाबत पोलिसांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र अपवाद वगळता या विभागाचा कारभार कागदावरच अस्तित्वात आहे.
मुख्य दक्षता व सुरक्षा अधिका:याच्या रिक्त पदाबाबत थेट गृह विभागाकडे मागणी करत नाही, त्याबाबत गृहनिर्माण विभागाला पत्रद्वारे कळविले आहे; मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे म्हाडाचे सचिव दिलीप हळदे यांनी सांगितले. दरम्यान, अधिकारी न नेमण्याबाबत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.