कंधार (जि़ नांदेड) : राष्ट्रकुटकालीन कंधारच्या भुईकोटाचे संवर्धन व दुरुस्तीसाठी शासनाने पावणेपाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे़ त्यातून डागडुजीच्या कामांनी वेग घेतला असून लवकरच या किल्ल्यास पूर्ववैभव प्राप्त होणार आहे़२४ एकरवरील किल्ल्याचे विस्तीर्ण बांधकाम इतिहासप्रेमी व पर्यटकांना भुरळ घालणारे आहे़ तटबंदी, बुरूज व किल्ल्यातील बारादरी, लालमहाल, राणी महल, शीशमहाल, बारूदखाना, कैदखाना, जलमहल, दरबार महल, राजा महाल, राजबाग स्वार, अंबरखाना, प्रवेशद्वार, भुयारी मार्ग आदीने वास्तू भक्कम करण्यात आल्या आहेत.केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत किल्ला विकासासाठी ५ वर्षांपूर्वी ३ कोटी ४० लाख ७८ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटकांचे आगमन व सुविधा केंद्र, सुरक्षा कक्ष व तिकीट घर, प्रसाधनगृह, पादचारी रस्ता, वाहनतळ, फुड प्लाझा, कुंपण भिंत, कारंजे पूल आदी कामे त्यातून करण्यात येणार आहेत. किल्ल्यांतर्गत भग्न वास्तूचे पूर्ण बांधकाम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे येथील पर्यवेक्षक सुबोध वाघमारे यांनी सांगितले.
कंधार भुईकोटास मिळणार पूर्ववैभव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 2:23 AM