शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

कन्नडीगांना बेळगावमध्येच रोखले

By admin | Published: August 03, 2014 1:27 AM

महाराष्ट्र राज्य फलक हटविल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी येळ्ळूरमध्ये जाणा:या कन्नड रक्षण वेदिकेच्या शेकडो कार्यकत्र्याना पोलिसांनी बेळगावमध्येच रोखले.

बेळगाव : महाराष्ट्र राज्य फलक हटविल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी येळ्ळूरमध्ये जाणा:या कन्नड रक्षण वेदिकेच्या शेकडो कार्यकत्र्याना पोलिसांनी बेळगावमध्येच रोखले. मागील आठवडय़ापासून येळ्ळूरमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण पोलिसांनी येळ्ळूरकडे जाणारे सारे रस्ते रोखले असल्यामुळे संघर्ष टळला. कन्नड रक्षण वेदिकेचा राज्य अध्यक्ष नारायण गौडा याला हुबळीत पोलिसांनी ताब्यात घेऊन माघारी पाठवून दिले. 
दरम्यान, ‘वेदिके’च्या कार्यकत्र्यानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनांमुळे बेळगावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 
दरम्यान, बेळगावकडे येणाचा प्रयत्न करणा:या 75क् हून कार्यकत्र्याना पोलिसांनी अटक केल्याची माहिती उत्तर विभागाचे आयजीपी भास्कर राव यांनी दिली. या सा:यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळत असून, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. (प्रतिनिधी)
 
चोख पोलीस बंदोबस्त
या घटनेनंतर महापालिका आणि सर्व सरकारी कार्यालयांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मोडतोड करण्याचा प्रयत्न करणा:या वेदिकेच्या कार्यकत्र्याना पोलिसांनी ताब्यात घेतले. महांतेशनगर येथे हुल्लडबाजी करणा:या वेदिकेच्या कार्यकत्र्याना पोलिसांनी अटक केली. शहरात येणा:या वाहनांची पोलीस तपासणी करीत आहेत.
 
सभा,बैठका घेण्यास बंदी
येळ्ळूरसह बेळगाव तालुक्यात महाराष्ट्र राज्यावरून सभा आणि बैठका घेण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
मराठी वृत्तपत्रंवर कारवाई 
बेळगावातील काही मराठी वृत्तपत्रंनी जिल्हा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची बदनामी केल्याचा ठपका ठेऊन,  मराठी जनतेला भडकावणा:या वृत्तपत्रंवर कठोर कारवाई करण्याचा इशारा भास्कर राव यांनी दिला. 
 
येळ्ळूर आणि बेळगाव शहर परिसरातील वातावरण पूर्वपदावर येत असताना कोणत्याही पक्षाचे तसेच संघटनेचे नेते येऊन जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांच्यावर कोणताही मुलाहिजा न राखता कठोर कारवाई केली जाईल़  बेळगावकडे येण्याचा प्रयत्न करणा:या 75क् हून अधिक व्यक्तींना अनेक ठिकाणी पोलिसांनी अटक केली आह़े  - भास्कर राव, आयजीपी , बेळगाव