मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या व्यक्तव्यानंतर राजकीय नेत्यांसह सेलिब्रेटींनीही तिच्यावर टीकेची झोड उठवली. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा कंगना राणौतला उपरती झाली आणि एक ट्विट मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळले, असे म्हणत मुंबईबाबत आपले प्रेम दाखवून देण्याचा प्रयत्न केला. याबाबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्राचा अपमान करणारा कुणीही असेल कितीही मोठा असेल. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, याचे भान ठेवून बोलणे गरजेचे आहे. मुंबई, महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही. मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचे कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. हा मुद्दा फक्त शिवसेनेचा नाही आहे तर हा विषय महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. मुंबईसाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यायला हवे. माझे कंगना राणौत हिच्यासोबत व्यक्तिगत भांडण नाही."
"मी काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भूमिकेचे वाचन केले. भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले की कंगना राणौतने मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही. आशिष शेलार यांनी हे अधिक आक्रमकपणे बोलले पाहिजे, हा महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एका पक्षाचे नाही, एका जातीचे नाहीत तर देशाचे आणि महाराष्ट्राचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दांत टिप्पण्णी करत असेल तर विषय एका राजकीय पक्षाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, " असे संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, मराठी वाचता येतं का? मुंबईत १०-१५ वर्षे राहतात आपण मराठी शिकलात का? म्हणून स्वत:चे ट्विटर हँडल स्वत:च वापरायचे, दुसऱ्यांना द्यायचे नसते. राजकीय पक्षांच्या आयटी टीमला देऊ नये म्हणून असे घोळ होतात, असा टोलाही संजय राऊत यांनी कंगना रानौतला लगावला आहे.
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा; कंगनाचे खुले आव्हान"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.
कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशाराकंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला आहे.
कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाहीराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर जोरदार टीका केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहाणे सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
आणखी बातम्या...
- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश
- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक
-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान
- पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल