नाशिक : स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार आज दुपारी साडेचार वाजता नाशिकमध्ये येणार असून छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कु मार यांच्या सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या ठिकाणी येणाºया विद्यार्थी कार्यकर्त्यांना वाहने आणण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. सभेसाठी वाहनतळ जवळच्या पाचशे मीटर अंतरावरील ईदगाह मैदान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी एखाद्या ‘व्ही.व्हीआयपी’च्या सभेप्रमाणे नियमावली आखून दिली आहे.
सभा मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्ग बसस्थानकाला लागून असलेल्या तुपसाखरे लॉन्स येथे होणार आहे. लॉन्समध्ये कु ठल्याही प्रकारच्या खुर्च्यांचा वापर सभेला आलेल्या कार्यकर्त्यांना करता येणार नाही. व्यासपिठावरील खुर्च्या वगळता सभेत खुर्च्या ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रवेशद्वारावर धातुशोधक यंत्रासह ‘प्रवेश कमान’ लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी सभेच्या ठिकाणी पाण्याच्या बाटलीपासून तर कुठल्याहीप्रकारे खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात आली आहे. सभेला येताना कुठल्याहीप्रकारचे काळे कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही संघटनेचा सदस्य व कार्यकर्ता सांगून बंदोबस्तावरील पोलिसांवर दबाव आणू नये. तपासणीसाठी प्रवेशद्वारावर पोलिसांना सहकार्य करावे.