शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

बलात्कार फसल्याने केली तनुश्रीची हत्या

By admin | Published: August 23, 2016 3:09 AM

तनुश्री डोलाई हिची एका अल्पवयीन मुलाने केलेली हत्या चोरीसाठी नव्हे तर बलात्कार करण्याच उद्देशानेच करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले

विरार : नालासोपाऱ्यातील तरुण विवाहित महिला तनुश्री डोलाई हिची एका अल्पवयीन मुलाने केलेली हत्या चोरीसाठी नव्हे तर बलात्कार करण्याच उद्देशानेच करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्नाचे कलम जोडले आहे. नालासोपाऱ्यातील डीडी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या तनुश्री डोलाई (२३) या महिलेची ९ जुलै रोजी तिच्या दहा महिन्यांच्या बाळासमोरच हत्या झाली होती. पोलिसांनी तनुश्रीच्या शेजारी राहणाऱ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणाला लगेचच अटक केली होती. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.मात्र. याप्रकरणात पोलिसांना संशय असल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता हत्येपूर्वी तनुश्रीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशी दीडतास आरोपीबरोबर मयत तनुश्रीची झटापट सुरू होती. त्याने बलात्काराचा प्रयत्न केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे सापडले आहेत. त्यामुळे त्याच्यावर नवीन कलमे दाखल केली आहेत.दरम्यान, मयत तनुश्री ही पती आणि तान्ह्या बाळासह या इमारतीत राहत होती. आ़रोपी १७ वर्षांचा तरूण असून तो तिच्याच शेजारी राहतो. घटनेच्या दिवशी संध्याकाळी तनुश्री घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी बलात्काराच्या उद्देशाने घरात गेला होता. परंतु तनुश्रीने प्रतिकार करताच त्याने तिचा गळा चिरला. हत्या चोरीसाठी झाल्याचे दिसावे यासाठी तिचा मोबाईल आणि सोनसाखळी त्याने लंपास केली. नंतर तो गर्दीत जाऊन उभा राहिला, पोलिसांना त्याच्या घरात रक्ताचा एक थेंब आढळल्याने अवघ्या दोन तासात त्याला अटक केली. मोबाईल फोनसाठी हत्या केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. मात्र, पोलिसांना याप्रकरणात संशय आल्याने तंनी वैद्यकी तपासणी केली. त्यात आरोपीने बलात्कारासाठीच हत्या केल्याचे उजेडात आले आहे. (प्रतिनिधी)