शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

शाळेच्या पहिल्या दिवशी ‘कन्या प्रवेशोत्सव’!

By admin | Published: June 12, 2016 4:27 AM

मुलींच्या शाळेतील प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच १०० टक्के मुले-मुली पटावर आणण्यासाठी १५ जून २०१६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी ‘कन्या प्रवेशोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात

मुंबई : मुलींच्या शाळेतील प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच १०० टक्के मुले-मुली पटावर आणण्यासाठी १५ जून २०१६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी ‘कन्या प्रवेशोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयातील पत्रकार कक्षात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशाताई लांडगे, इतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याकरिता हातभार लावावा. तसेच आपल्या भागातील मुलींना स्वत: शाळेत घेऊन जावे व प्रवेश करावा, असेही रहाटकर यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत शक्य झाल्यास मुलीस शालोपयोगी साहित्य देऊन त्यांचे शाळेत स्वागत करावे, असे रहाटकर यांनी या वेळी सांगितले. नंदुरबार, गडचिरोली, परभणी, नांदेड, हिंगोली या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी असून तेथे मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)