- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - आपल्या उत्तम अभिनयाने लोकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणा-या कॉमेडी किंग कपिल शर्मांला महापालिकेने मात्र गंभीर केलं आहे. महापालिकेने आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्माने केला आहे. कपिल शर्माने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून महापालिकेने लाच मागितल्याचा आरोप केला असून याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करत हेच का तुमचे अच्छे दिन ? असा सवाल विचारत नाराजी व्यक्त केली आहे.
'मी गेली 5 वर्ष न चुकता 15 कोटींचा आयकर भरत असतानाही माझ्या कार्यालयासाठी महापालिकेला 5 लाखांची लाच द्यावी लागते, हेच का तुमचे अच्छे दिन ?', असं ट्विट कपिल शर्माने केलं आहे.
I am paying 15 cr income tax from last 5 year n still i have to pay 5 lacs bribe to BMC office for making my office @narendramodi— KAPIL (@KapilSharmaK9) September 9, 2016
Yeh hain aapke achhe din ? @narendramodi— KAPIL (@KapilSharmaK9) September 9, 2016
ट्विटनंतर महापालिकेने कपिल शर्माला तक्रार नोंद करण्यासाठी सांगितलं असून ज्या व्यक्तीने लाच मागितली त्याचं नाव उघड करण्याची मागणी केली आहे.
सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कडक कारवाई करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.BMC requests Comedian Kapil Sharma to make a formal complaint and tell them the name of the officer who demanded bribe from him.— ANI (@ANI_news) September 9, 2016
Kapilbhai pls provide all info.
Have directed MC,BMC to take strictest action.
We will not spare the culprit.@KapilSharmaK9@narendramodi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 9, 2016