मुंबई : भल्या पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांनी विनोदवीर कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे टि्वट करताच दिवसभर राष्ट्रीय बातमीचा विषय बनलेले हे प्रकरण संध्याकाळपर्यंत वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले. ज्या बांधकामासाठी लाचखोरीचा आरोप केला, ते बांधकामच अनधिकृत असल्याचे समोर आल्याने कपिलचा पुरता ‘फ्लॉप’ शो झाला! वर्सोवा येथील कार्यालयाच्या कामाकरिता महापालिकेच्या अधिकाऱ्यानी ५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्माने टिष्ट्वटद्वारे केला. शिवाय, हे टिष्ट्वट त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले. कपिल या टिष्ट्वटमध्ये केवळ आरोप करून थांबलेला नाही, तर आपण आत्तापर्यंत १५ कोटींचा कर भरल्याचे म्हणत ‘हेच का अच्छे दिन,’ असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली. दुसरीकडे कपिलच्या टिष्ट्वटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याने या प्रकरणी दिवसभर चांगलीच ‘टिवटिव’ रंगली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कपिल शर्माला अधिकृतरित्या पत्र लिहून तो लाचखोर कोण? अशी विचारणा केली. मात्र ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी लाच मागितल्याचे कपिल सांगतोय, ते कार्यालयच अनधिकृत असल्याचे समोर येत आहे. महापालिकेने १६ जुलै २०१६ रोजी कपिल शर्माला पाठविलेल्या नोटीशीत बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश देण्यात आले होते. या नोटीशीची एक प्रत वर्सोवा पोलिसांनाही पाठवण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. कदम यांचे सायबर पोलिसांना पत्रकपिल शर्माने केलेल्या टिष्ट्वटच्या चौकशीसाठी सायबर पोलिसांना भाजपचे आमदार राम कदम यांनी पत्र लिहिले आहे. कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर सायबर सेलने हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावे, असे पत्रात म्हटले आहे. आम्हाला अर्ज मिळालेला असून याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कपिल मुख्यमंत्र्यांना भेटणारदरम्यान, प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता दिसताच कपिलने आपल्या टिष्ट्वटची दखल घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत भेटण्याची ईच्छा व्यक्त केली.>कपिलभाई, नाव जाहीर करा!कपिलच्या टिष्ट्वटला काही क्षण उलटताच त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. ‘कपिलभाई कृपया नाव जाहीर करा. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात सोडणार नाही,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कपिलला आश्वस्त केले. राणेंचे व्हिडीओ टिष्ट्वट : कपिलच्या तक्रारीची तत्काळ दखल घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले. ‘कपिल शर्माच्या टिष्ट्वटची लगेच दखल घेतली जाते. पण मी गेल्या अनेक वर्षांपासून हाच मुद्दा उचलत असूनही याकडे लक्ष दिले जात नाही,’ असा उपाहासात्मक टोला नितेश यांनी लगावला. कपिलचा मुखवटा घालून त्यांनी एक व्हिडीओदेखील शेअर केला.
कपिल शर्माचा ‘हास्यास्पद’ शो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 6:11 AM