चेतन धनुरे/ सतीश जोशीउस्मानाबाद/बीड : विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शेवटच्या क्षणी उमेदवारांची उसनवारी झाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. भाजपाचे रमेश कराड यांनी राष्टÑवादी काँग्रेसकडून तर राष्टÑवादीचे सुरेश धस यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपाला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर आघाडी सरकारमधील माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव भाजपात प्रवेश करण्यापूर्वीच उमेदवार म्हणून जाहीर झाले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश कराड यांना पक्षप्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. मात्र तोपर्यंत आघाडीचा निर्णय झालेला नसल्यामुळे अंबाजोगाई येथील काँग्रेस नेते राजकिशोर मोदी यांचा अर्ज शेवटच्या दिवशी दाखल होणार होता. त्यासाठी आ. अमर राजूरकर एबी फॉर्मसह उस्मानाबादेत दाखल झाल होते. पावणेदोनच्या सुमारास आघाडीचा निरोप आला. राष्ट्रवादीतून उमेदवारीची अपेक्षा असणारे उद्योजक अशोक जगदाळे यांनी बंडाचे निशाण फडकावीत अर्ज दाखल केला आहे.संख्याबळाचा खेळ...या मतदारसंघात एकूण १००६ मतदार असून त्यात काकू-नाना आघाडीसह राष्ट्रवादीकडे जवळपास ३३६, काँग्रेसकडे १९१ तर भाजपा ३०२, शिवसेना ६५, एमआयएम २०, तर अपक्षांचे संख्याबळ ९२ इतके आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने एकत्रित संख्याबळ ५२७ तर महायुतीचे ३६७ आहे. भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांची उमेदवारी दाखल करताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मात्र कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होती. ऐरवी एकमेकांवर टीका करणारे, े आ. भीमराव धोंडे हेदेखील आवर्जून या वेळी उपस्थित होते,
कराड राष्ट्रवादीकडून तर धस भाजपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 5:25 AM