रूपेश खैरीवर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करण्याचा फतवा शासनाने काढला. त्यानुसार काम सुरू झाले असले तरी बहुतांश ठिकाणी आधार क्रमांक आणि ओटीपीची समस्या निर्माण झाली असून त्यासाठी बायोमेट्रिक मशीनची गरज आहे. ‘मंत्रा’ नावाने ओळखली जाणारी ही मशीनच नसल्याने नोंदणीच्या कामाला खोडा बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आॅनलाइन नोंदणी करण्याकरिता वर्धेत एकूण १६९ सुविधा केंदे्र कार्यरत आहेत. या केंद्रांवर शेतकºयांकडून जिल्हा प्रशासनाच्या आयटी विभागातील कर्मचारी नोंदी करीत आहेत.त्या करताना प्रारंभी शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या नावे असलेली वेबसाईट बंद असल्याने ‘आपलं सरकार’ या शासकीय संकेतस्थळावरून शेतकºयांचे अर्ज भरणे सुरू आहे. यातही अर्ज भरताना शेतकºयांचा आधार क्रमांक मागण्यात येतो. आधार क्रमांक देताच ओटीपी क्रमांक मागण्यात येतो.जिल्ह्यातील सुविधा केंद्रावर अर्ज करण्याकरिता येत असलेल्या शेतकºयांचा आधार क्रमांक आणि ओटीपीमुळे काही अडचणी निर्माण होत आहे. यावर मार्ग काढण्याकरिता बायोमेट्रिक पद्धत अवलंबिली जात आहे. याकरिता मंत्रा नामक यंत्राची गरज आहे. ते यंत्र जिल्ह्याला मिळाले नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे.- प्रतीक उमाटे, जिल्हा समन्वयक महाआॅनलाइन जिल्हाधिकारी, कार्यालय, वर्धा
कर्जमाफीच्या आॅनलाइन नोंदीला ‘मंत्रा’चा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 4:33 AM