शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Published: December 15, 2014 4:09 AM

उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही त्यांची अंमलबजावणी करण्यात शासकीय अधिकाऱ्यांची अनास्था कशी नडते, याचे उदाहरण

मुंबई : उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही त्यांची अंमलबजावणी करण्यात शासकीय अधिकाऱ्यांची अनास्था कशी नडते, याचे उदाहरण म्हाडाकडून काढण्यात येणाऱ्या अंध व अपंगासाठी घराच्या सोडतीबाबत पाहावयास मिळत आहे. या गटातील मतिमंद व मनोविकृत अर्जदारांचे उत्पन्न व पालकत्वाच्या निकषाची निश्चिती करण्यात प्राधिकरणाचे अधिकारी असमर्थ ठरले आहेत.आता या संदर्भातील निर्णयाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टोलवण्यात आला आहे. त्यामुळे सोडतीचा कार्यक्रम अनिश्चित कालावधीसाठी रेंगाळला असून त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या निराशेत आणखी भर पडणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या म्हाडाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही प्रकारच्या अर्जदारांच्या पालकत्त्वाबाबत बनविलेल्या निकषाच्या नियमाबाबत प्राधिकरणाच्या विधी विभागाने स्वत:निर्णय घेण्याऐवजी राज्य सरकारकडून मार्गदर्शन घ्यावे, असे मत मांडले आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हाडाच्या मुंबई व कोकण मंडळांच्या ६६ घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. मुंबईतील २०११ व १२ सोडतीतील ४९ आणि कोकण मंडळातील २०११ च्या सोडतीतील १७ घरांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी अपंग व अंधाच्या संवर्गाबाबत दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात आॅक्टोबरमध्ये निकाला देताना ३० नोव्हेंबरपर्यंत लॉटरीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. म्हाडाच्या २०११ व १२ या वर्षातील सोडतीत स्थगिती ठेवलेल्या अंध व अपंग या राखीव गटातील लॉटरीची प्रक्रिया ३० नोव्हेंबरपूर्वी सुरु करा, असे आदेश उच्च न्यायालयाने अडीच महिन्यांपूर्वी दिले आहेत. मात्र पहिल्यादा घरांच्या किंमती व त्यानंतर मतिमंदत्व व मनोविकृतीच्या पालकत्वाच्या निश्चिती न झाल्याने सोडतीचा प्रत्यक्ष कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. केवळ त्याबाबतची कार्यवाही सुरु केल्याचे सांगून ३१डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ मागण्यात आलेली होती. आता त्यामध्ये आणखी वाढीसाठी विनवणी केली जाणार आहे. मुंबई व कोकण मंडळांच्या ६६ घरांसाठी लॉटरी काढावयाची आहे.घराच्या सोडतीत अंध व अपंग संवर्गाच्या प्रचलित नियमाविरोधात २००९ मध्ये उच्च न्यायालयात एका स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे २०११ व १२ या दोन वर्षांतील लॉटरीतील या गटातील घरे राखीव ठेवली होती. न्यायालयाने आॅक्टोबरमध्ये त्याबाबत निकाल देताना ३० नोव्हेंबरपर्यत लॉटरीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश बजाविले. या गटासाठी नव्याने निश्चित केलेल्या विविध ७ प्रवर्गातील व्यक्तींना पात्र ठरविले. त्यामध्ये पूर्ण अंध, कमी दृष्टि, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधीर, अवयवातील कमतरता, मतिमंदत्व आणि मनोविकृती या प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या वर्षापासून म्हाडाची लॉटरी काढण्यात येत आहे. आता प्रलंबित ठेवलेल्या दोन वर्षांतील घरांची सोडत काढावयाची आहे. (प्रतिनिधी)