ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 14 - छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू यूथ फाऊंडेशनतर्फे रविवारी सकाळी पन्हाळा ते कोल्हापूर अशी बुलेट रॅली काढण्यात आली. या रॅलीत पाचशेहून अधिक स्त्री-पुरुष बुलेटस्वारांनी सहभाग घेतला होता. यानिमित्त श्रीमंत छत्रपती मालोजीराजे व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शंभुज्योतीचे प्रज्वलन झाले.अत्यंत देखण्या व शाही पद्धतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात पारंपरिक पोशाखासह भगवे फेटे बांधलेले युवक-युवती सहभागी झाले होते. रॅलीच्या प्रारंभी पारंपरिक हलगीचा कडकडाट आणि संभाजी महाराजांची यशोगाथा आणि पराक्रम पोवाड्यांद्वारे सादर करण्यात आला.रॅलीच्या बुलेटस्वार युवकांच्या हातामध्ये शंभुराजांची प्रतिमा व त्यांच्या कार्याचे, सामाजिक संदेश व प्रबोधन करणारे फलक होते; तर प्रत्येक बुलेटस्वाराच्या तोंडी ह्यसंभाजी महाराज की जयह्णआणि ह्यजय शिवराय, जय भवानी,ह्ण असा उद्घोष होता. रॅलीचे उद्घाटन छत्रपती मालोजीराजे, छत्रपती मधुरिमाराजे व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि त्यांच्या पत्नी रूपाली नांगरे-पाटील यांच्या हस्ते झाले. पन्हाळगडावरून येताना बुलेटस्वारांनी निसर्ग संवर्धनाच्या हेतूने रस्त्याच्या दुतर्फा देशी झाडांच्या बियांचे सीडबॉल टाकले; तर केर्ले व वडणगे ग्रामस्थांनी रॅलीवर पुष्पवृष्टी केली. यावेळी पन्हाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, आदी उपस्थित होते. या रॅलीचे आयोजन संदीप पाटील, स्वप्निल यादव, हृषिकेश देसाई, प्रसाद वैद्य, विजय अगरवाल, नरेश इंगवले यांच्यासह फौंडेशनचे कार्यकर्त्यांनी केले होते.-----विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व छत्रपती मालोजीराजे यांनी सपत्निक पन्हाळगड ते भवानी मंडप असा बुलेटवर स्वार होऊन प्रवास केला. यावेळी त्यांच्या छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी युवकांची लगबग सुरू होती.----पन्हाळगड येथील शिवाजी महाराज मंदिर येथून काढण्यात आलेली ही रॅली पन्हाळा-शिवाजी पूल-पंचगंगा घाट (संभाजी महाराज समाधी)-गंगावेश-रंकाळा स्टँड-तटाकडील तालीम मंडळ-अर्धा शिवाजी पुतळा-शिवाजी पेठ-गांधी मैदान-खरी कॉर्नर-बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड-पापाची तिकटी-महापालिका चौक-शिवाजी चौक-भवानी मंडप येथे संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाप्त करण्यात आली. यावेळी ह्यपानिपतह्णकार विश्वास पाटील यांचे व्याख्यान झाले. यात त्यांनी संभाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रमुख घटनांवर प्रकाश्झोत टाकून इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केल्याचे विवेचन केले.
पन्हाळगड ते करवीर बुलेट रॅली रंगली शाही थाटात
By admin | Published: May 14, 2017 9:39 PM