शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

"कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच", देवेंद्र फडणवीसांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 7:28 AM

Maharashtra Karnataka Border Dispute: सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काहीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही आणि आमचा सीमा भाग आम्हाला मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील गावांवर आमचा दावा आजचा नाही. त्यामुळे त्याबाबत मी केलेले वक्तव्य चिथावणीखोर नाही. जे रास्त आहे ती मागणी मी केलेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.  सीमाप्रश्न राज्य निर्मितीपासून सुरू आहे. महाराष्ट्राने सातत्याने यासंदर्भात आपली भूमिका पक्की ठेवली आहे. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालय योग्य भूमिका घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. 

कर्नाटकची बस अडवून केला निषेध दौंड (जि. पुणे) : अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुक्याच्या वतीने शहीद भगतसिंग चौक, दौंड येथे कर्नाटक सरकारची निपाणी-संभाजीनगर बस अडवून कर्नाटक सरकारचा, मुख्यमंत्री बोम्मई यांचा जाहीर निषेध करण्यात आला. निपाणी -  संभाजीनगर बस अडवून ड्रायव्हर कंडक्टरला भगवा पंचा घालून व बसवर निषेधाचे फलक लिहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. कर्नाटक राज्यातील बसचे चालक आणि वाहक तसेच बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेला कुठलाही धोका कार्यकर्त्यांनी पोहोचू दिला नाही. 

कर्नाटकला एक इंचही जागा जाऊ देणार नाहीकर्नाटकला एक इंचसुद्धा जागा जाऊ देणार नाही. सरकार त्यासाठी समर्थ आहे. मी या प्रश्नावर ४० दिवस कर्नाटकमध्ये तुरुंगवास भोगला आहे. जतचा मुद्दा २०१२ चा आहे. त्यावेळी सरकार कोणाचे होते?        - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

काय देता, काय घेता, यावर चर्चा होऊ शकते कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत; परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल, यावर चर्चा होऊ शकते. काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी 

‘त्यांच्या अंगात भूत संचारलंय’कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. बोम्मई हे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? असा सवालही त्यांनी केला. 

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा दावा निरर्थकअक्कलकोट, सोलापूरमध्ये शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक राहत आहेत. ते महाराष्ट्राचे भाग आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा निरर्थक आहे.     - डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद 

४८ खासदारांनी केंद्राचे लक्ष वेधावे... सीमाप्रश्नावर राज्यातील ४८ खासदारांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवावा. सर्वपक्षीय शिष्टमंडळानेही भेटावे. या लढ्यात राज्य सरकारने ताकदीनं उभं राहायला हवं.    - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक