Karnataka Election: "कर्नाटकात जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार, ऑपरेशन लोटसची संधीच नाही मिळणार", नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:23 PM2023-05-09T17:23:05+5:302023-05-09T17:24:07+5:30

Karnataka Assembly Election: काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे

Karnataka Election: "In Karnataka people will do BJP's operation, there will be no chance of Operation Lotus", Nana Patole's gang | Karnataka Election: "कर्नाटकात जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार, ऑपरेशन लोटसची संधीच नाही मिळणार", नाना पटोलेंचा टोला

Karnataka Election: "कर्नाटकात जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार, ऑपरेशन लोटसची संधीच नाही मिळणार", नाना पटोलेंचा टोला

googlenewsNext

मुंबई - कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपाला पोषक वातावरण नसल्याने त्यांनी केरला स्टोरी चित्रपटाचा आधार घेत जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपाच्या अशा कोणत्याच भुलथापांना कर्नाटकची जनता बळी पडणार नाही. काश्मीर फाईल्स चित्रपटाचे भांडवल करत भाजपाने काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत असल्याचा डांगोरा पिटला. काश्मीरमध्ये राज्यपाल आहेत, केंद्रात भाजपाची सत्ता आहे मग काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी काय केले. ते सत्तेत असतानाच काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले आहेत. मणिपूरमध्येही भाजपाची सत्ता आहे पण तेथे दोन जनसमुदायात मोठा संघर्ष पेटला आहे. मणिपूर जळत असताना देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री मात्र कर्नाटकात मताचा जोगवा मागत फिरत आहेत. भाजपाने बजरंग बलीच्या नावावरही मते मागण्याचा प्रयत्न केला पण भाजपाचा तो मुद्दाही कर्नाटकात चालला नाही. बजरंग बलीचा आशिर्वाद काँग्रेसबरोबर आहे. कर्नाटकात काँग्रेसचेच सरकार येणार आहे, त्यामुळे तेथे ऑपरेशन लोटस करण्याची वेळच भाजपावर येणार नाही, जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार आहे,  असा दावा नाना पटोले यांनी केला. 

भारतीय जनता पक्ष खोटारडा पक्ष असून ऐनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मागील विधानसभा निवडणुक निकालानंतर कर्नाटमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. मध्यप्रदेश मध्येही काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापन केली होती. परंतु जनतेचा कौल भाजपा मान्य करत नाही, त्यांच्याजवळ सीबीआय, ईडी सारख्या सरकारी यंत्रणा आहेत. या सरकारी यंत्रणांचा मोदी सरकार सत्तेसाठी दुरुपयोग करत असते हे देशातील जनतेने पाहिले आहे. महाराष्ट्रातही आमदारांची खरेदी करून भाजपाने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. कर्नाटकात मात्र यावेळी भाजपाच्या ४० टक्के कमीशनवाल्या सरकारला घरी बसवण्याचा निर्णय कर्नाटकच्या जनतेने घेतल्याचे दिसत आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. 

Web Title: Karnataka Election: "In Karnataka people will do BJP's operation, there will be no chance of Operation Lotus", Nana Patole's gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.