बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 06:53 PM2023-05-13T18:53:51+5:302023-05-13T18:54:27+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोदी-शाहांवर शाब्दिक वार
Jayant Patil on Karnataka Elections: बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली. कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत आणले, असेही जयंत पाटील म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपाच्या खात्यात केवळ ६४ जागा गेल्या. तर काँग्रेसने तब्बल १३६ जागांवर कब्जा केला. या पराभवाबरोबरच भाजपाच्या दक्षिण भारतातील अभियनाला मोठा धक्का बसला आहे.
जनतेला भ्रष्टाचार आणि जातिधर्मांत तेढ निर्माण करणारे मुद्दे नको आहेत हे सिद्ध झाले. संपूर्ण देश पादाक्रांत करण्याची भाषा करणारे लोक आज संपूर्ण दक्षिण भारतातून हद्दपार झाले आहेत. @NCPspeaks वतीने मी @INCKarnataka सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन करतो.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 13, 2023
याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, "बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली. कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत आणले. जनतेला भ्रष्टाचार आणि जातीधर्मांत तेढ निर्माण करणारे मुद्दे नको आहेत हे सिद्ध झाले. संपूर्ण देश पादाक्रांत करण्याची भाषा करणारे लोक आज संपूर्ण दक्षिण भारतातून हद्दपार झाले आहेत असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे," असे ट्विट त्यांनी केले. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले.
ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले. "बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदीजींच्या प्रचाराला ठेंगा दाखवला. मीडिया जेपी नड्डाजी किंवा सीएम बोम्मईजी यांचा चेहरा पराभूत म्हणून दाखवू शकतो पण पंतप्रधान मोदींचे अपयश आहे कारण त्यांनी संपूर्ण प्रचार स्वतःबद्दल केला आहे" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले.