मुंबई : पश्चिम बंगालसह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने देशासह महाराष्ट्राला चांगलाच दगा दिला असून, कर्नाटक, केरळ, गोव्यासह कोकणात कमी पाऊस झाल्याचा निष्कर्ष स्कायमेटने महिनाअखेर काढला आहे.आतापर्यंत देशभरात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. पश्चिम किनारपट्टीला तसेच ईशान्येकडील भागात झालेला कमी पाऊस हा याला कारणीभूत आहे. देशात मान्सूनच्या काळात या दोन्ही भागात नेहमी सर्वांत जास्त पाऊस होत असतो. सर्वसाधारणपणे ईशान्य दिशेकडील भागात भरपूर पाऊस होतो. मात्र यंदा त्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय मान्सून पश्चिमेकडून तसा फारसा सक्रिय झाला नसल्याने दक्षिण भारतातही कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, कोकण आणि गोवा हे भागही कमी पावसाच्या यादीत सामील झाले आहेत. उत्तर कर्नाटकातील भाग, मराठवाडा, रायलसीमा, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश येथील पावसाची कमतरता आता धोक्याच्या पातळीला जाऊन ठेपली आहे, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
कर्नाटक, केरळ, गोव्यासह कोकणात पाऊस कमीच!
By admin | Published: September 01, 2015 1:37 AM