Kasba Bypoll Election 2023: “मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता, तरीही पोटनिवडणूक लढणारच”; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 03:07 PM2023-02-05T15:07:23+5:302023-02-05T15:08:37+5:30

Kasba Bypoll Election 2023: कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले.

kasba bypoll election 2023 cm eknath shinde phone call to nana patole but congress firm to fight election in pune | Kasba Bypoll Election 2023: “मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता, तरीही पोटनिवडणूक लढणारच”; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

Kasba Bypoll Election 2023: “मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता, तरीही पोटनिवडणूक लढणारच”; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

googlenewsNext

Kasba Bypoll Election 2023: आताच्या घडीला संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजपला ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हायला हवी आहे. मात्र, महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे. भाजपच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून, महाविकास आघाडीतील नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता, तरीही पोटनिवडणूक लढणारच, असे ठामपणे सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन करून कसब्यातून उमेदवार न देण्याबाबत आवाहन केले. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला जात नाही. ही आपली परंपरा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी पटोले यांना सांगितले. मात्र, नाना पटोले यांनी कसब्यातून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

परंपरेचा मुद्दाच निकाली निघाला असून, पोटनिवडणूक लढवणारच

मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. कसब्यासाठी त्यांचा फोन आला होता. त्यांनी परंपरा सांगितली होती. कुटुंबातील कोणी जातो तर आपण ती जागा बिनविरोध निवडून देतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कसब्यातून भाजपने टिळक कुटुंबातून उमेदवार दिला नाही. त्यामुळे परंपरेचा मुद्दाच निकाली निघाला आहे. भाजपने कसब्यातून कुटुंबात उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आम्ही कसब्याची तयारी करत आहोत. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. पक्षाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत लक्ष देत आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले.

सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, तेव्हा त्यांच्याकडे सरकारविषयी तक्रार केल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही. सत्तेत आल्यापासून तुम्ही आमची कामं थांबवली आहेत. यापूर्वी अशी कामं थांबवली गेली नव्हती, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. कसब्याच्या उमेदवारीबाबत लवकरच काँग्रेसचे नाव निश्चित होईल. उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले आहे. अजित पवार, जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, चिंचवडचे मला माहीत नाही. चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत. कसब्याबाबत प्रस्ताव देण्याची विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. पण भाजपने टिळक कुटुंबातून उमेदवारी न दिल्याने आता तो प्रश्नच राहिला नाही, असेही ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: kasba bypoll election 2023 cm eknath shinde phone call to nana patole but congress firm to fight election in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.