नाशिक : भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा प्रयत्न केले, मात्र पाकिस्तान सुधारण्याच्या स्थितीत नाही़ प्रत्येक वेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानसमोर पंतप्रधान मोदींनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून राजकीय मुत्सद्देगिरी दाखविल्याने पाकची कोंडी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर आता केवळ पाकव्याप्त काश्मीरचा विषय शिल्लक राहिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथे केले.देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री व खासदारांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांना भेट देण्यास सांगितले आहे. त्यानुसार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर व येवला येथील स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकास अहिर व रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रविवारी भेट दिली़ इसिसबाबत केंद्र गंभीर केरळ तसेच मराठवाड्यातील इसिसच्या प्रसाराबाबत केंद्र सरकार गंभीर आहे़ त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडून मागविण्यात आला आहे़ इसिसच्या प्रभावाखाली असलेल्या कुटुंबांना त्यातून संपूर्णत: बाहेर काढेपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याचे अहिर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
काश्मीरचा मुद्दा संपला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 5:26 AM