शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

केडीएमसीत मुख्यमंत्री पडले एकटे

By admin | Published: November 06, 2015 2:19 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिले, तसे भाजपाच्या मंत्र्यांनी का केले नाही, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

- यदु जोशी , मुंबईकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिले, तसे भाजपाच्या मंत्र्यांनी का केले नाही, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा काही जणांचा प्रयत्न होता का, अशी शंकाही या निमित्ताने पक्षांतर्गत चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम, दादा भुसे आणि इतरही नेते सहा दिवस कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकून होते, तसे भाजपाच्या एकाही मंत्र्याने केले नाही. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी काही सभा घेतल्या, पण त्यांच्यासह कोणत्याही मंत्र्याने या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचे दिसले नाही, असे आता म्हटले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षसंघटना कामाला लावली, पण ते स्वत: इतर ठिकाणच्या महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत गुंतलेले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन प्रचार सभा, एक विकास परिषद आणि २७ गावांसाठीची सभा अशी पाच भाषणे दिली. विकास परिषदेत त्यांनी स्मार्ट सिटीची पद्धतशीर मांडणी केली आणि निवडणुकीची सूत्रे स्वत:कडे घेतली. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली म्हटल्यानंतर, इतर मंत्र्यांनी त्यांना साथ दिल्याचे दिसले नाही. शिवसेनेत मात्र उलट चित्र होते. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक अंगावर घेतली आहे, तर आता यशापयशाचे धनीही तेच ठरतील, हा विचार करून तर सुरक्षित अंतर राखले गेले नाही ना, अशी चर्चादेखील या निमित्ताने होत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीतील संघ परिवाराने मनसेला साथ दिली होती. त्याचा मोठा फटका भाजपाला बसला होता. यावेळी असे होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी संघाच्या स्थानिक धुरिणांशी बंदद्वार चर्चा केली. मात्र, भाजपमधील एका बड्या नेत्याच्या कल्याणमधील समर्थकाने तिकीटवाटपात संघ-भाजपानिष्ठांना डावलल्याने संघ परिवार सुरुवातीला प्रचंड नाराज होता.उपऱ्यांना संधी देण्यावरून परिवाराने प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका सुरुवातीला घेतली होती. असे घडवून आणण्यासाठी भाजपातील काही लोक पडद्याआडून सक्रिय होते का, अशी शंका आता घेतली जात आहे.