कल्याण : केडीएमसीचे २०१६-१७ चे सुधारित व २०१७-१८ चे अंदाजपत्रक शुक्रवारी आयुक्त ई. रवींद्रन स्थायी समितीला सादर करणार आहेत. याच वेळी परिवहन आणि शिक्षण विभागाचे अंदाजपत्रकही स्थायीला सादर केले जाईल. त्यासाठी सकाळी १० वाजता अंदाजपत्रक सादरीकरणाची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. केडीएसीच्या अंदाजपत्रकातील आर्थिक ठोकताळे व योजना या ठोस कृतीअभावी कागदावरच राहतात, ही वस्तुस्थिती आहे. प्रतिवर्षी उत्पन्नवाढीचे ध्येय समोर ठेवले जाते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. गेल्याच वर्षीच्या अंदाजपत्रकात उत्पन्नवाढ तसेच नव्याजुन्या योजनांच्या पूर्ततेचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. मात्र, त्याची पूर्तता झालेली नाही.केडीएमटी उपक्रमाने त्यांचे अंदाजपत्रक परिवहन समितीला सादर केले आहे. त्यात केवळ आगारांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे उपक्रमाकडून परिवहन समितीला सादर झालेले अंदाजपत्रक हे स्थायी समितीला परिवहन सभापतींकडून सादर केले जाते. परंतु, समितीचे सभापती भाऊसाहेब चौधरी हे कार्यकाळ संपल्याने ते निवृत्त झाले आहेत. त्यामुळे अंदाजपत्रक हे उपक्रमाचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याकडूनच स्थायीला सादर केले जाईल. (प्रतिनिधी) नवीन योजनांकडे लक्षअंदाजपत्रकात नवीन योजना आहेत की, मागील अंदाजपत्रकाची पुनरावृत्ती केली जाते, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
केडीएमसीचे आज बजेट
By admin | Published: March 03, 2017 4:12 AM