यदु जोशी -कोल्हापूर --भाजपचे नेते, कार्यकर्त्यांचा ‘पब्लिक कनेक्ट’ कमी होत असल्याची चिंता पक्षाला सतावत असल्याचे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट झाले. केंद्र तसेच राज्य सरकार दरदिवशी चांगले निर्णय घेत आहे; मात्र ते जनतेपर्यंत पोहोचत नसल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. १९९५ ते ९९ या काळात तत्कालिन युती सरकारने चांगले निर्णय घेऊनही राज्यात पुन्हा सत्ता आली नाही. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या, जनतेपर्यंत जा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक शुक्रवारपासून येथे सुरू झाली. त्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सरकारचे निर्णय सामान्यांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या योग्य अंमलबजावणीसाठी कार्यकर्ते, नेत्यांनी सक्रिय सहभाग देण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. सरकारच्या निर्णयांचे वाहक म्हणून पक्षसंघटनेने संचलन समितीप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे, असे सांगून, सरकार आणि संघटनेने एकमेकांचा आदर केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाचे सरकार आणि पक्ष संघटना यांत समन्वय नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून हीच बाब अधोरेखित झाली. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील ४४ आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ९५मध्ये युती सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले होते; पण ते प्रभावीपणे जनतेसमोर न गेल्याचा फटका बसून आपण सत्तेत येऊ शकलो नव्हतो, हे लक्षात ठेवा. त्यातून धडा घेऊन आपण काम करणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारमध्ये भाजपाचे नेते, कार्यकर्ते हे जनतेच्या हिताची कामे घेऊन आल्यानंतर त्यांना सन्मानाचीच (पान ८ वर)उतणार नाही, मातणार नाही भाजपचा राज्याला शब्दकोल्हापूर : जनतेच्या सेवेचा वसा आम्ही सोडणार नाही. उतणार नाही, मातणार नाही, जनतेच्या सेवेचा वसा सोडणार नाही. जनतेने दिलेल्या आश्वासनाचे सोने केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द राज्यातील जनतेला देणारा ठराव भाजपा राज्य परिषदेत शनिवारी मांडण्यात येणार आहे. शिवसेनेची अप्रत्यक्ष खिल्लीकेंद्राच्या योजनांची माहिती राज्यातील जनतेला देण्यासाठी प्रदेश भाजपा २६ मेपासून पाच दिवस ‘जनकल्याण पर्व’ राबविणार आहे. त्यात सहभागी होण्याची तयारी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनीही दाखविली आहे. त्यासाठी काय करायचे अशी विचारणा त्यांनी आपल्याकडे फोनवरून केली, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्यावर, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात काही बदल झाले तर....!’ ही भीती तर या विचारणेमागे नाही ना, असा चिमटा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढताच हशा पिकला.प्रदेश कार्यालयात मंत्र्यांचे जनता दरबारमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्यातील आणि राज्यातून केंद्रात गेलेल्या सर्व मंत्र्यांना प्रदेश कार्यालयात जनता दरबार घेण्याचे आदेश शुक्रवारच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिले. त्याविषयीचे जूनचे वेळापत्रक यावेळी निश्चित करण्यात आले. याशिवाय, मंत्र्यांना दर आठवड्यात किमान २ तास पक्ष कार्यालयात बसून जनतेशी संवाद साधावा लागणार आहे.
समन्वय ठेवा, अन्यथा ९५ ची पुनरावृत्ती
By admin | Published: May 23, 2015 12:11 AM