शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक राखावा

By admin | Published: September 13, 2015 2:51 AM

शौर्य व कर्तबगारीमध्ये मुंबई पोलीस दलाचे जगभरात नाव आहे. त्याची प्रतिष्ठा आणि चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक शासनाने सांभाळला पाहिजे, असे सूचक उदगार काढीत

मुंबई : शौर्य व कर्तबगारीमध्ये मुंबई पोलीस दलाचे जगभरात नाव आहे. त्याची प्रतिष्ठा आणि चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक शासनाने सांभाळला पाहिजे, असे सूचक उदगार काढीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राकेश मारिया यांच्या मुंबईच्या आयुक्तपदाच्या उचलबांगडीप्रकरणी राज्य सरकारला टोला हाणला. माजी सहाय्यक आयुक्त इसाक बागवान लिखित ‘इसाक बागवान ’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. मी हा विषय कशासाठी काढला हे समजले असेल त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गृहराज्य मंत्री रणजीत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत आदी उपस्थित होते.पवार म्हणाले,‘ बारामतीच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील इसाक बागवान यांचा मोठा बंधू रझाक माझे वर्ग मित्र होते, त्यांनी कायद्याची पदवी घेतली. मी गृहराज्यमंत्री असताना अधिकाऱ्यांची नावांची यादी पाहिल्यानंतर इसाक पोलीस दलात असल्याचे समजले. सहा वेळा माझ्याकडे गृह खाते होते, एकवेळा राज्यमंत्री होतो पण एकदाही त्यांनी किंवा त्यांच्या बंधूनी आपल्याकडे बदलीसाठी विचारणा केली नाही. त्यांच्यासारख्या कर्तृत्वान अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांची शान वाढलेली आहे. त्यांचा आदर्श नव्या अधिकाऱ्यांनी घेण्यासाठी त्यांच्या पुस्तकाचा समावेश पोलिसांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात केला पाहिजे. आयपीएस अधिकारीही बदलीसाठी राजकारण्याच्या मागे लागतात, असे सांगताना एका आयपीएस अधिकाऱ्याने एका खासदाराला पाठविलेल्या मेसेजचे उदाहरण देऊन पवार म्हणाले,‘ मुंबई पोलीस दल , गुन्हे शाखा हे एक सर्वोत्कृष्ट दल आहे. त्याचा , चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक जपण्याची गरज आहे. या वेळी मला पुस्तक लिहायचे नव्हते. मात्र आपल्याकडून माहिती घेऊन दुसरीच माहिती माध्यमाकडून दाखविली जात असल्याने गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे इसाक बागवान यांनी सांगितले. यावेळी संजय राऊत, राज्यमंत्री पाटील, अभिनेते अनिल कपुर,अ‍ॅड. मजिद मेनन, माजी अधिकारी मधूकर झेंडे आदीची भाषणे झाली. व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, बापू करंदीकर, अभिनेते रजा मुराद, फरीद अली आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘इसाक बागवान’चे प्रकाशन : सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) इसाक बागवान लिखित ‘इसाक बागवान’ या आत्मचरित्राचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खा. संजय राऊत उपस्थित होते.