शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 6:25 AM

Ajit Pawar : पालघर जिल्हा संकुलातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि प्रशासकीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभासी प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)द्वारे केले.

पालघर :  एखादी वास्तू, प्रकल्प, योजना या लोकांच्या श्रमाच्या, घामाच्या पैशांतून उभ्या राहत असतात. आपल्याला मिळतो तो पगारही जनतेच्या पैशांतून दिला जात असल्याची जाणीव आमच्यासह सर्वांनी ठेवून जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघर मुख्यालयाच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले.

     पालघर हा नवनिर्मित तरुण जिल्हा असून, या जिल्ह्याला विकासाच्या धर्तीवर बळ देण्याचे काम महाविकास आघाडी करेल. देशात पालघर जिल्हा सर्वोत्तम जिल्हा असल्याचे आपल्या कामातून दाखवून देऊ या, असे सांगून आपला पालघर जिल्हा विविधतेने नटलेला संपन्न जिल्हा असल्याने आपण एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पालघर जिल्हा संकुलातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि प्रशासकीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभासी प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)द्वारे केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आदी उपस्थित होते. 

प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा कृषीमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण, आदी उपस्थित होते. पालघर जिल्हा आणि वसई-विरारच्या विकासाचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांपुढे तो सादर करण्यात आल्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. राजेंद्र गावित सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनीही भाषणातून आपली मते व्यक्त केली.

पॅलेसच्या धर्तीवर रचना - संपूर्ण देशात एक रोल मॉडेल ठरेल अशा, १०३ हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर, जव्हारच्या मुकणे महाराज संस्थानच्या जयविलास पॅलेसच्या धर्तीवर सिडकोने मुख्यालयाच्या इमारतीची रचना केली आहे. - ही वास्तू उभारण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी या निर्जीव वास्तूला आपल्या कार्यातून जिवंतपणा आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. - पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात रोल मॉडेल ठरेल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpalgharपालघर