मुंबई : विलंबाने सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामाची झाडाझडती पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मासिक आढावा बैठकीत शनिवारी घेतली़ ३१ मे ही नालेसफाईची डेडलाइन दरवर्षी चुकत असल्याने, वेळापत्रकानुसारच कामे पूर्ण करण्यास आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजावले़नाल्यांमधील गाळ वर्षभर टप्याटप्प्याने काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़ त्यानुसार, पावसाळ्यापूर्वी ६० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित आहे़ मात्र, नालेसफाई घोटाळ्यामुळे ठेकेदार मिळण्यास विलंब झाला़ त्यामुळे गेल्या महिन्यात नाल्यांमधील गाळ काढण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली़ हे काम संथगतीने सुरू आहे़ या कामाचा आढावा आयुक्तांनी घेतला़ त्यानुसार, आतापर्यंत ३८ टक्के नालेसफाईची काम पूर्ण झाले असल्याचे उजेडात आले़ या प्रकरणी आयुक्तांनी खातेप्रमुख, उपायुक्त, सहायक आयुक्त अशा सर्वच अधिकाऱ्यांना फैलावर घेत, डेडलाइन पाळा, असे बजावले़ त्यानुसार, अधिकाऱ्यांनीही वेळापत्रकानुसारच काम पूर्ण होईल, अशी हमी दिली आहे़ (प्रतिनिधी)मुंबईत मोठे व छोटे नाले, तसेच नद्यांची एकूण लांबी ६५० कि़मी़ आहे़ यापैकी शहरात १०९ कि़मी़, पूर्व उपनगरांमध्ये २३० कि़मी़ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३११ कि़मी़ लांबीचे नाले आहेत़एकूण आठ लाख दोन हजार ८३१ मेट्रिक टन गाळ सुमारे १५ महिन्यांत काढणे अपेक्षित आहे़
‘नालेसफाईची मुदत पाळा’
By admin | Published: May 08, 2016 1:36 AM