जलसंपदामंत्र्यांचे पोलिसांना आवाहन : दीक्षान्त समारंभ; सिंधुदुर्गची मेधा राणे सर्वोत्कृष्ट
नाशिक : पोलिसांवर सामाजिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी असते़ वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारांचे तंत्र पाहता पोलिसांनी गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे असावे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११२ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ महाजन यांच्या उपस्थितीत झाला. पुण्याचा रूपेश टेमगिरे व सिंधुदुर्गची मेधा राणे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरले. महाजन म्हणाले,गुन्हांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कर्तव्यदक्ष राहून प्रामाणिकपणे काम करण्याची आवश्यकता आहे़ ११२ व्या तुकडीतील १६३ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांमध्ये केवळ दोन महिलांचा समावेश आहे. हे प्रमाण पुरुषांच्या बरोबरीने असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ यशाचे मानकरी रूपेश टेमगिरे : मानाची तलवार, यशवंतराव चव्हाण गोल्ड कप, बेस्ट आॅलराउंड कॅडेट मेधा राणे : सावित्रीबाई फुले कप, बेस्ट वुमेन कॅडेट इन इनडोअर सबजेक्ट, अहल्याबाई होळकर कप, बेस्ट आॅलराउंड वुमेन कॅडेट इन द बॅच, बेस्ट कॅडेट इन क्राईम इन्व्हेस्टीगेशन मनोज पाटील : डॉ़ बी़ आऱ आंबेडकर कप, बेस्ट कॅडेट इन लॉ गणेश कुलाल : बेस्ट कॅडेट इन क्रिमिनोलॉजी अॅण्ड पेनॉलॉजी प्रदीप आरोटे : बेस्ट कॅडेट इन मॉडर्न टेक्नॉलॉजी इन डिलिंग विथ क्राउड अॅण्ड अन-लॉफूल असेम्ब्ली पोलीस दलातील १४ वर्षांच्या सेवेबरोबरच जिद्द, चिकाटी कायम ठेवून खातेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले़ गुन्हेगारी कमी करणे तसेच दोषसिद्धी वाढविणे हे लक्ष्य आहे़ - मेधा राणे, उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची परतफेड समाजातील जनतेची सेवा करून करणार आहे़ - रूपेश टेमगिरे, उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी