लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कडधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात कडधान्यांची पेरणी २१.४६ टक्क्यांनी घटल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत तुरीचा पेरा ११ लाख हेक्टरवर रखडला असून, मूग आणि उडीद लागवडीत तर सर्वाधिक घट झाली आहे.
राज्यात तुरीची पेरणी केवळ १० लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात झाली. त्यात लातूर विभागात सर्वाधिक ४ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली. यवतमाळ जिल्ह्यात एक लाख ७ हजार हेक्टर, नागपूर जिल्ह्यात ५४ हजार हेक्टर तर अमरावती जिल्ह्यात एक लाख ६ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे.
भाव चांगला तरी तुरीचा पेरा ९ टक्क्यांनी घटलाn३१ जुलैपर्यंत राज्यात कडधान्यांचा पेरा २१.४६ टक्क्यांनी कमी आहे. त्यात तुरीच्या पेरणीतील घट ९ टक्के आहे. सर्वाधिक घट मूग व उडीद लागवडीत दिसते. nराज्यात मागील खरिपात ३ लाख ४४ हजार हेक्टरवर उडदाची लागवड झाली होती. यंदा आतापर्यंत एक लाख ९६ हजार हेक्टरपर्यंत लागवड होऊ शकली. इतर कडधान्यांचा पेराही ३२ टक्क्यांनी घटला.