अहमदनगर : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल रविवारी रात्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये अण्णा व केजरीवाल यांची भेट निश्चित झाली आहे. केंद्र शासनाने लष्करासाठी ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करावी, या मागणीसाठी अण्णा दिल्लीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्यासाठी शनिवारी सायंकाळी ते दिल्लीत पोहोचले. तेथे त्यांचे जोरदार स्वागत झाल्याची माहिती हजारे यांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी दिली. केजरीवाल राजकारणात गेल्यापासून अण्णा व केजरीवाल यांच्यात दुरावा आला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल राळेगणसिद्धी येथे येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला होता. दिल्ली येथील आंदोलनात केजरीवाल यांना पुन्हा प्रवेश देणार नाही, अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)
केजरीवाल अण्णांना भेटणार
By admin | Published: July 26, 2015 2:22 AM