ठाणे : सोलापूरमध्ये इफेड्रीनचा साठा हस्तगत करून ठाणे पोलिसांनी १० जणांना गजाआड करण्यात आले. त्यांच्या चौकशीतून या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांची आणखी नावे पुढे आली. त्यात प्रामुख्याने सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णीचा समावेश आहे. तिचा नवरा ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी याने केनियात बैठक घेऊन या साठ्याचे वितरण कसे व कुठे करायचे, हे निश्चित केले होते. पोलीस तपासात हे सर्व डील उघड झाले.विकी गोस्वामी याने केनियात ८ जानेवारी २०१६ रोजी घेतलेल्या बैठकीत एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. कंपनीचा डायरेक्टर मनोज जैन, ममता कुलकर्णी, विकीचा भागीदार व टांझानिया येथील सबुरी फार्मा कंपनीचा संचालक डॉ. अब्दुला व त्याचे दोन साथीदार, फरार किशोर राठोड, जयमुखी हे उपस्थित होते. ही बैठक केनियाच्या मोंबासा येथील हॉटेल ब्लीसमध्ये झाली. सोलापूरमध्ये उपलब्ध व तयार होणारे इफेड्रीन डॉ. अब्दुला याच्या सबुरी फार्मा कंपनीच्या नावे केनिया, टांझानिया येथे पाठवून, तेथे त्यावरील प्रक्रियेद्वारे मेथ अॅम्फाटामाईन (आईस) बनवून ते युरोप, अमेरिकेसह जगातील इतर देशात विक्री करण्याची योजना पक्की झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.मेथ ५० हजार डॉलर प्रति किलो दराने विक्री करण्याचे ठरल्यावर त्यावर होणाऱ्या नफ्यामध्ये विक्की गोस्वामी व डॉ. अब्दुला यास ३३, मनोज जैन व पुनीत श्रींगी यांना ३३ आणि किशोर राठोड व जयमुखी यांना ३३ टक्के प्रमाणे वाटा देण्याचे ठरले. एव्हॉन कंपनीत पडून असलेल्या इफेड्रीनची स्टॉकमध्ये नोंद नसल्याने ते जैन याने गोस्वामी व डॉ. अब्दुला यांना तत्काळ पाठवावे, असेही ठरले. व्यवहार सुरळीतपणे चालण्याकरिता जैन याने एव्हॉन कंपनीचे शेअर्स ज्याचा दर ३५ ते ४० रुपये प्रति शेअर्सचा असताना, तो २६ रुपये प्रति शेअर्स असा ठरवला. शिवाय, कंपनीचे २ कोटीपेक्षा जास्त शेअर्स आहेत. त्यातील ११ लाखापेक्षा जास्त शेअर्स ममता कुलकर्णी हिच्या नावे ट्रान्सफर करायचे आणि तिला सोलापूरच्या कंपनीत संचालक करायचे, असे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)१०० किलो इफेड्रीन मुंबईतून पाठविलेएव्हॉन कंपनीतील १०० किलो इफेड्रीन हे विकी गोस्वामी याच्या सांगण्यावरून त्याच्या माणसांकडे मुंबईतील मोहम्मद अली रोड येथे देऊन ते एअर कार्गोने केनिया व टांझानियामध्ये पाठविण्यात आले. तेथे पोहचल्यावर तीन दिवसांत त्याचे पैसे मनोज जैन याला केनिया ते गुजरात व गुजरात ते मुंबई असे हवालामार्फत पाठविण्यात आले होते.मेथची प्रति किलो किंमत ५० हजार डॉलरइफेड्रीनवर प्रक्रियावर केल्यावर यातील ३० ते ४० टक्के इफेड्रीन वाया जात होते. तर उर्वरित ६० ते ७० टक्क्यांचे मेथ तयार होत होते. त्यानुसार त्या मेथची प्रति किलो किंमत ५० हजार रुपये डॉलर होते. मात्र, ठाणे पोलिसांनी जप्त केलेल्या २३ टन इफेड्रीनची किंमत पोलिसांनी २ हजार कोटींहून अधिक असल्याचे म्हटले आहे. परंतु ५० हजार डॉलरनुसार त्याची किंमत त्यापेक्षा जास्त असावी अशी माहिती पोलिसांनी दिली.विरारमध्येही गोदाम घेतलेपालघर जिल्ह्णातील विरार येथे जयमुखी इफेड्रीनचा साठा ठेवण्यासाठी गोदाम घेण्यात आले होते. मात्र, तेथे इफेड्रीन ठेवण्यात आले नाही, असे तपासात पुढे आले आहे.
केनियाच्या बैठकीत ठरले इफेड्रीनचे डील
By admin | Published: June 19, 2016 2:20 AM