शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

केसरकरांचा आरोप : पंधरा वर्षांची पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू?

By admin | Published: January 09, 2015 11:39 PM

नारायण राणे संपलेले प्रकरण

सावंतवाडी : रेडीला उच्च दर्जाचे बंदर असताना आरोंदा बंदराला परवानगी देणे चुकीचेच आहे. आरोंदा बंदर हे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जन्माला घातलेले अपत्य आहे, असा आरोप सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केला. पंधरा वर्षांत राणे यांनी केलेल्या कामांची चौकशी करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. केसरकर यांनी यावेळी राणे यांनी केलेली पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू, असा सवालही केला. आरोंदा येथे झालेल्या दगडफेक व लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, मी या जिल्ह्याचा पालक आहे. त्यामुळे मी माझ्याच लोकांवर लाठीमार करण्याचे आदेश कसे देईन? हे आदेश पोलिसांच्या वरिष्ठस्तरावर होत असतात. त्यात लोकप्रतिनिधींची कोणतीही भूमिका असत नाही. मी फक्त कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेऊ शकतो. लाठीमार करा, एफआयआरमधील कलमे बदला, असे सांगू शकत नाही, असा खुलासाही केला.चार दिवसांपूर्वी आरोंदा येथे काँग्रेसचे पदाधिकारी गेले होते. जर त्यांनीच या जेटीला परवानगी दिली, तर ते कशासाठी गेले? लोकांना भडकावण्यापेक्षा यातून मार्ग काढून देणे गरजेचे आहे, असे मतही केसरकर यांनी यावेळी मांडले. आतापर्यंत त्यांना आरोंदावासीयांचा पुळका का आला नाही? माझ्या मतदारसंघातील हा प्रश्न असून आरोंदावासीय माझे आहेत. त्यांनी मला मते दिली आहेत. त्यामुळे त्यांची अडचण ती माझी अडचण असून, त्यांना न्याय हा दिलाच जाईल. प्रदूषणकारी प्रकल्प पर्यटनस्थळी नकोचआरोंदा हे पर्यटन स्थळ असून तेथे प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नये, असे मला वाटते, आरोंदा पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येत आहे. पण तेथे अशा प्रदूषणकारी प्रकल्पाला त्या काळात परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवाल केसरकर यांनी केला. आरोंदा व तेरेखोल खाडीपात्राच्या मुखाशी असलेली भिंत जर फोडली गेली, तर त्याचा फटका बांदा व आरोंदा गावांना बसणार आहे. तेरेखोल खाडीपात्राचा उगम आंबोलीतून होतो. निसर्गाला आणखी किती हानी पोहोचवणार, असाही सवाल केसरकर यांनी उपस्थित (प्रतिनिधी)नारायण राणे संपलेले प्रकरणनारायण राणे हे माझ्यावर चुकीच्या पद्धतीने टीका करीत आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देत राहिलो, तर जिल्ह्याचा विकास होणार नाही. अनेक कंपन्या जिल्ह्यात येऊ पाहात आहेत. पण चांगले वातावरण नसेल, तर ते होणार नाही. त्यामुळे आता टीकेला उत्तर नाही, असे सांगत, नारायण राणे हे माझ्यासाठी संपलेले प्रकरण आहे, असे केसरकर यांनी सांगितले.