ऑनलाइन लोकमतचाळीसगाव, दि. ४ : महसूलमंत्री एकनाथराव खडसे तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्याविरुध्द सबळ पुरावा नसताना त्यांची व भाजपाची प्रतिमा मलिन केली म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरुध्द चाळीसगाव न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष दत्तू पाटील यांनी चाळीसगाव न्यायालयात ४९, ५००, कलम २०० नुसार खटला दाखल केला व आरोपीविरुध्द प्रोसेस इश्यूचीमागणी केली आहे. फिर्यादीतर्फे अॅट.डी.एन.बोराडे, अॅड.योगेश सोनवणे, अॅड.अनिल दराडे यांनी काम पाहिले. पुढील सुनावणीची तारीख ३० जुलै ही आहे.
खडसे प्रकरण : चाळीसगाव न्यायालयात दमानियांविरुद खटला
By admin | Published: July 04, 2016 7:20 PM