नेतेपदी डावलल्याने नाराजी : मंत्रिमंडळ निवडीत सन्मान राखण्याचे आश्वासन
मुंबई : भाजपामध्ये जेव्हा काही मिळण्याची वेळ येते तेव्हा बहुजन समाजातील नेत्यांवर अन्याय केला जातो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी मंगळवारी विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यार्पयत पोहोचवली. आता मंत्रिमंडळ निवडीत तरी बहुजनांचा सन्मान राखा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. यामुळे खडसे यांना महसूल किंवा तत्सम तोलामोलाचे खाते देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे बोलले जात आहे.
भाजपाचे आमदार व नेते प्रदेश कार्यालयात दाखल झाले तरीही दीर्घकाळ खडसे हे त्यांच्या बंगल्यावर बंद खोलीत समर्थकांसह रुसून बसले होते. ओम माथूर, व्ही. सतीश वगैरे मंडळींनी खडसे यांना दूरध्वनी करून बोलावले, तरीही खडसे कार्यालयात दाखल न झाल्याने अखेरीस बंडोबांची समजूत काढण्यात हातखंडा असलेल्या पांडुरंग फुंडकर यांना खडसे यांच्या भेटीकरिता धाडण्यात आले. दिवंगत गोपीनाथ मुंडे नाराज असताना हेच फुंडकर त्यांची समजूत काढण्याकरिता धावपळ करीत होते. खडसे यांच्याबरोबर फुंडकर यांची दीर्घकाळ चर्चा झाली. ज्येष्ठतेच्या निकषानुसार विधिमंडळ गटनेतेपदी आपली निवड होणो अपेक्षित होते.
मात्र जेव्हा भाजपामध्ये काही देण्याची वेळ येते तेव्हा बहुजन समाजाला डावलले जाते, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. आपल्या प्रकृतीच्या उलटसुलट बातम्या पेरून आणि आपल्याला विधानसभा अध्यक्षपद देण्याच्या कंडय़ा पिकवून मंत्रिमंडळातील आपला प्रवेश रोखण्याचा प्रयत्न हेतूत: केल्याची नाराजी खडसे यांनी व्यक्त केल्याचे कळते. (प्रतिनिधी)
मंत्रिमंडळ निवडीत तरी बहुजनांवरील हा अन्याय दूर केला जाईल, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. त्यानंतर योग्य सन्मान राखण्याबाबत शब्द दिला गेल्यावर खडसे बंद खोलीतून बाहेर आले व विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला रवाना झाले.
‘राज्य सुसंस्कृत करण्याचे स्वप्न’
स्वाभाविकपणो मुलाच्या देदीप्यमान यशाने कुठलीही माता हुरळून जाते. देवेंद्र यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा त्यांची आई सरिता करीत होत्या. सातत्याने त्या दूरचित्रवाहिनीसमोर बसून होत्या. घरात कार्यकत्र्याची गर्दी आणि बाहेर जल्लोषाचे वातावरण. त्यामुळे सरिता फडणवीस शांतपणो त्यांच्या बेडरूममध्ये टीव्हीसमोर होत्या. देवेंद्र यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांच्या चेह:यावर स्मितहास्य उमटले. आता या क्षणाला आई म्हणून काय वाटतेय, असे विचारले असता त्या म्हणाल्या, देवेंद्रने महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त, महिलांना सुरक्षितता प्रदान करणारा आणि सुसंस्कृत करावा. सत्ता केवळ सेवेसाठी असते, हाच त्याचा संस्कार आह़े
नागपुरात दिवाळी !
माध्यमांचे प्रतिनिधी कॅमेरे सरसावून तयार.. देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर फटाक्यांची माळ तयार.. संदल आणि वाजंत्री पथकही बाजूलाच प्रतीक्षेत.. फडणवीस यांचे जुने मित्र आणि कार्यकर्ते केवळ औपचारिक घोषणोची वाट पाहात रेंगाळत असताना अध्र्या मिनिटाच्या आत सा:यांचेच फोन खणखणले.
बस्स.. फायनल.. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा.. अवघ्या 1क् सेकंदांच्या आत देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर संदलच्या ठेक्यावर कार्यकत्र्यानी ताल धरला. महिलांनी फुगडी खेळून आणि रिंगण करून आनंद व्यक्त केला, तर उत्साही कार्यकत्र्याच्या फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण दुमदुमले.
नागपूर-विदर्भवासीयांना फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटत असताना सारे वातावरण त्यांच्याच बाजूने होते. पण पक्षाच्या
संसदीय मंडळाची बैठक झाल्याशिवाय त्यांचे नाव अधिकृतपणो जाहीर झाले नव्हते. भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि नागपूरकर जल्लोषात बुडाले.
देवेंद्र करणार महाराष्ट्राला नंबर वन
देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात नंबर वन होईल़ त्यांच्या नेतृत्वात विदर्भ, कोकण व मराठवाडय़ाच्याही विकासाला चालना मिळेल. मिहान प्रकल्पाला गती मिळेल. नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणो उभे आहोत. गेल्या 15 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात राज्याची पिछेहाट झाली. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्राचा सर्वागीण विकास होईल, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.