शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

खडसेंची धमकी पक्षाला की नेत्यांना?

By admin | Published: July 01, 2016 6:02 AM

मी तोंड उघडले तर देश हादरला असता, असा गर्भित इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याने भाजपात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुंबई/जळगाव : माझ्याविरोधात ठरवून कारस्थान केले गेले. पण मी तोंड उघडले तर देश हादरला असता, असा गर्भित इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याने भाजपात प्रचंड खळबळ उडाली आहे. खडसेंचा हा इशारा पक्षाला आहे की, पक्षातील एखाद्या विशिष्ट नेत्याला, यावर खल सुरू झाला असल्याचे समजते.भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिपद सोडावे लागलेल्या खडसे यांनी काल जळगावात बोलताना बाहेरच्यांबरोबर पक्षांतर्गत विरोधकांचाही समाचार घेतला. मुंबईतील भाजपा कोअर कमिटीची मीटिंग आटोपून खडसे जळगावात आले होते. त्यांच्यासमवेत पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी हेदेखील होते. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. यावरून कोअर कमिटीत बरेच काही झाले असावे, असा तर्क काढला जात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही नाथाभाऊंच्या पाठीशी असल्याचे सांगत, खडसेंना पाण्यात पाहणाऱ्यांचा आपण निषेध करतो, असे सूचक वक्तव्य भुसारी यांनी केल्याने अनेकांच्या भुवया आधीच उंचावल्या होत्या. त्यानंतर स्वत: खडसे यांनी वरील सूचक वक्तव्य केले. खडसे म्हणाले, पक्षातील एक ज्येष्ठ नेता म्हणतो खडसेंनी घरात पदे दिली. ताकद असेल तर गावात सरपंच होऊन दाखवा. आपल्यात राहून गद्दारी करत असेल तर त्याला तेथेच धडा शिकवा... यापुढे आपला कोण ते ओळखा. नाथाभाऊंमुळे जे मोठे झाले तेच मागे कुरबुर करत असतील तर त्यांनी भूतकाळ आठवला पाहिजे. पक्षाच्या जिवावर सेटिंग कधी केली नाही, असे चिमटे त्यांनी एका नेत्याचे नाव न घेता काढले.खडसे यांच्या वक्तव्यानंतर भाजपात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी खडसेंना फोन करून ‘जरा सबुरी घ्या’ असा सल्ला दिल्याचे समजते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांना ‘कमी बोला, बोलून प्रॉब्लेम वाढवू नका,’ असा सल्ला दिला होता. परंतु तरीही खडसेंच्या मनातील खदखद काल बाहेर पडलीच. (विशेष प्रतिनिधी)>एकनाथ खडसेंची सारवासारवबुधवारी जळगावात ‘देश हादरवून’ सोडण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आज यू-टर्न घेत खडसेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भुसावळ येथील नवीन तहसील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले, ‘मी गौप्यस्फोट करतो असे म्हणालो नव्हतो, तर मोदींचा एक मंत्री (म्हणजे ते स्वत:) दाऊदच्या संपर्कात असल्याचे सिद्ध झाले असते, तर देश हादरला असता, असे मला म्हणायचे होते.’खडसे तोंड उघडा : खडसे हे विरोधी पक्षनेते असताना आपण कोणतेही वक्तव्य पुराव्याशिवाय करत नाही असे नेहमी सांगायचे. मी तोंड उघडले तर देश हादरून जाईल, असे वक्तव्य त्यांनी आता केले आहे. म्हणजेच त्यांच्याकडे त्याबाबतचे पुरावेही आहेत असा अर्थ होतो. त्यांना ही माहिती दाऊदने दिली की, त्यांच्या पक्षातील केंद्रीय किंवा राज्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती त्यांच्याकडे आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.>खडसेंनी ‘तो’ गौप्यस्फोट करावाच - राधाकृष्ण विखेमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देश हादरविणारी ‘ती’ माहिती एकदा उघड करावीच, ती दडवून ठेवणे देशहिताचे नाही. त्यामुळे खडसेंनी तो गौप्यस्फोट करावाच, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. विखे म्हणाले, खडसेंकडे धक्कादायक व संवेदनशील माहिती असतानाही ते बोलणार नसतील तर त्यांनी का व कोणत्या स्वार्थासाठी मौन बाळगले, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे देश हादरण्याची चिंता सोडून खडसेंनी ती माहिती उघड करण्याची गरज आहे.