शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

खडसेंचे ओएसडीही रडारवर

By admin | Published: May 19, 2016 6:22 AM

विशेष कार्यअधिकारी (ओएसडी) उन्मेश महाजन यांना आठवडाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे.

डिप्पी वांकाणी,

मुंबई- ३० कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे विशेष कार्यअधिकारी (ओएसडी) उन्मेश महाजन यांना आठवडाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. एका सामाजिक संस्थेला भूखंड मिळवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंत्री खडसे यांचा निकटवर्तीय गजानन पाटील यास एसीबीने सापळा रचून पकडले असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणाचे धागेदोरे उकलण्यास एसीबीने सुरुवात केली असून महसूल विभागातील काही अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची चिन्हे आहेत.चर्चगेटमधील मॅजेस्टिक आमदार निवासातील ११३ क्रमांकाच्या खोलीत गजानन पाटीलचा मुक्काम होता. त्याला ती रूम कोणी मिळवून दिली तसेच तो तेथे लाचेचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी होता का, याची आम्ही चौकशी करीत आहोत, असे एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. यात ओसडी उन्मेष महाजन यांचा सहभाग आहे का, याची पडताळणी एसीबी करीत असून अधिक चौकशीसाठी त्यांना पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. एसीबीने गेल्या सप्टेंबरपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यासंदर्भात पाटीलविरुद्ध पुरेसे पुरावे जमा केल्यानंतर सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार तक्रारकर्ते आणि पाटील यांच्यातील १२ बैठकांतील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. यातील बहुतांश रेकॉर्डिंग हे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील महसूल विभागाच्या कार्यालयात किंवा त्या परिसरात आणि नरिमन पॉइंट येथील खडसेंच्या बंगल्याबाहेर ६-सी, येथे करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.>दोघांमधील संभाषण केले रेकोर्डया प्रकरणात ओसडी उन्मेष महाजन यांचा सहभाग आहे का, याची पडताळणी एसीबी करीत असून अधिक चौकशीसाठी त्यांना पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. एसीबीने गेल्या सप्टेंबरपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यासंदर्भात पाटीलविरुद्ध पुरेसे पुरावे जमा केल्यानंतर गेल्या आठवड्यात सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार तक्रारकर्ते आणि पाटील यांच्यातील १२ बैठकांतील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले.