शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

खामगावातील अर्भक दिल्लीत, ३५ लाखांचा सौदा, सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 4:18 AM

खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

बुलडाणा : खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहृत बाळ दिल्लीत सुखरूप सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाच्या आदेशाने बाळ आई-वडिलांना सोपविण्यात आले. दरम्यान, या बाळाची विक्री करण्यासाठी अपहरण करण्याचे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमय्याबी आतीकखान या महिलेचे ५ दिवसांचे बाळ २७ सप्टेंबर रोजी पहाटे एका बुरखाधारी महिलेने पळविले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकारणाचा समांतर तपास खामगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या तपासात ३ वेगवेगळे पथक तयार केली.गुन्ह्यात वापरलेल्या वाहनावरून पोलिसांनी औरंगाबाद येथील नवीन बायजी पुरा येथील चालक राजे जहांगीर खान(४०), वाहन भाड्याने करून देणारा इरफान खान बशीर खान (२८) यांना ताब्यात घेतले. हे कळताच मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान, त्याची पत्नी प्रीती दाविद गायकवाड व तिची आई वेदिका किशोर पिल्ले हे तिघे जण तेथून पसार झाले.मुख्य आरोपी दौंड येथून पुण्याकडे यत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंड रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान (२१), त्याची पत्नी प्रीती दावीद गायकवाड (पिल्ले, रा. खामगाव) यांना दौंड येथून ताब्यात घेतले. त्याचवेळी अन्य पथकाने दिल्ली येथून मल्लिका बेगम पठाण हिंमत खान (रा. बाजार सावंजी जि. औरंगाबाद), फिरदोस अस्लम आसमानी (रा. गल्ल नं.९ वजीराबाद, दिल्ली) यांना अटक केली. त्यांच्याकडून बालकाची सुखरुप सुटका केली.हे अर्भक खामगाव येथून इंडिका कारने सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे नेण्यात आले. त्याचा सौैदा आधी सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे होणार होता. पण पोलीस पाठलाग करीत असल्याची कुणकुण लागल्याने आरोपींनी त्याला औरंगाबाद येथून विमानाने दिल्लीला नेले व मूल नसलेल्या या कोट्यधीश दाम्पत्याला विकले.हे दाम्पत्य कोट्यधीश असून त्यांना मूल बाळ होत नसल्याने त्यांनी प्रीती व मोहसीन यांच्याशी ३५ लाखांत एक बाळाचा सौदा केला होता. या दाम्पत्याने ७ लाख रुपये अ‍ॅडव्हान्सही दिले होते.बाळ १२ तास उपाशीखामगाव येथून पळविलेले बाळ विमानाने दिल्लीपर्यंत गेले खरे, पण या काळात त्याला साधे दुधसुद्धा आरोपींनी पाजले नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा