शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

‘खाकी’ घेणार दीर्घ श्वास

By admin | Published: June 19, 2017 2:44 AM

समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी वर्षातील बारा महिने अहोरात्र ड्युटी व बंदोबस्तामध्ये व्यस्त असणारे राज्यातील दोन लाखांवर खाकी वर्दीवाले येत्या बुधवारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी वर्षातील बारा महिने अहोरात्र ड्युटी व बंदोबस्तामध्ये व्यस्त असणारे राज्यातील दोन लाखांवर खाकी वर्दीवाले येत्या बुधवारी (दि. २१) जूनला अनुलोम विलोम, कपालभाती करत असल्याचे पाहावयास मिळणार आहे. राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये योग प्रशिक्षण शिबिर होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बंदोबस्त व अवेळच्या ड्युटीमुळे पोलिसांना मानसिक तणाव व विविध व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन व फिटनेस राहण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक आयुक्तालय/अधीक्षक व अन्य विविध शाखांच्या कार्यक्षेत्रात लोणावळ्यातील केवलधाम संस्थेशी करार करण्यात आला. त्यांच्याकडील तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करून पोलिसांना योगासनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांना सोयीचे ठरणाऱ्या वेळेत रोज सकाळी ३०-४५ मिनिटे योगासने शिकविण्यात येत आहेत. त्याला बहुतांश पोलीस घटकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता २१ जूनला देशभरात साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने सर्व घटकांमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्याची सूचना घटकप्रमुखांना करण्यात आलेली आहे. ज्या आयुक्तालय/अधीक्षक कार्यालयात योग प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही तेथील घटकप्रमुखांनी तातडीने केवलधाम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून २१ जूनला योग शिबिराचे आयोजन करावे, अशी सूचना पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केली आहे. योगदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल घटकप्रमुखांनी २८ जूनपर्यंत पोलीस मुख्यालयात पाठवावयाचा आहे.