शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

खालापूर स्मार्ट सिटी कागदावरच

By admin | Published: July 12, 2017 2:35 AM

सिडकोच्या उदासीनतेमुळे खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्प रखडला आहे

कमलाकर कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडकोच्या उदासीनतेमुळे खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पासाठी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात सामंजस्य करार झाला होता; परंतु मागील दोन वर्षांत यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुमारे ७ हजार ९0९ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प केवळ कागदापुरताच सीमित राहिला आहे. या प्रकल्पाला विविध कारणांमुळे खो बसल्याने त्याचा अप्रत्यक्ष फटका नैना क्षेत्रातील नियोजित विकासाला बसण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.नैना योजनेअंतर्गत खालापूर स्मार्ट सिटीचा विकास करण्याचे सिडकोने जाहीर केले आहे. त्यासाठी ११ गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणाऱ्या खालापूर नगरपंचायत, तसेच कलोटे मोकाशी व नादोडे या ग्रामपंचायतींनी एकूण ३५५0 हेक्टर जमिनीच्या लॅण्ड पुलिंगसाठी स्वेच्छेने तयारी दर्शविली आहे. खालापूर विशेष हेतू वहन कंपनीद्वारे (स्पेशल पर्पज वेहिकल) हा प्रकल्प हाताळण्याचे प्रस्तावित करण्यात आले. तर सिडको या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार झाल्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करून त्याला राज्य सरकारची मान्यता घेणे आवश्यक होते; परंतु मागील दीड वर्षांत यादृष्टीने कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाला खो बसल्याचे बोलले जात आहे. २३ गावांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्याच्या विकास आराखड्याला राज्य सरकाने अलीकडेच मंजुरी दिली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित २0१ गावांच्या विकास आराखड्यावर सिडकोने सूचना व हरकती मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील ११ गावे नैनाच्या दुसऱ्या टप्प्यात येतात. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळाल्याशिवाय या प्रकल्पावर सिडकोला अंमलबजावणी करता येणार नाही. त्यामुळेच हा प्रकल्प रखडल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. >विशेष हेतू वहन कंपनीनैना योजनेंतर्गत ६0:४0 स्वेच्छेने लॅण्ड पुलिंग संकल्पनेनुसार खालापूर स्मार्ट सिटीचे नियोजन व विकासासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर, महाड, शिरवली, निंबोडे, वणवे, नादोडे, निगडोली, कलोटे, मोकाशी, कलोटे रयाती, विणेगाव आणि कंद्रोली या प्रमुख गावांतील सहभागी भूमालकांच्या विशेष हेतू वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या विकासासाठी ४0 टक्के जमीन ही या खालापूर विशेष हेतू वहन कंपनीमार्फत दिली जाईल. विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण ६0 टक्के जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याची जबाबदारी याच कंपनीवर असेल. एकूणच पुण्यातील मगरपट्टी शहराच्या धर्तीवर ही स्मार्ट सिटी उभारण्याची योजना आहे.>७,९0९ कोटी खर्चाचे अंदाजपत्रकखालापूर स्मार्ट सिटीत पायाभूत सुविधांवर ३ हजार २८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आले होते. सिडकोतर्फे शहरी व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४ हजार ६२२ कोटींची गुंतवणूक अपेक्षित धरण्यात आली होती. एकूण ७ हजार ९0९ कोटी रूपयांचा हा प्रकल्प २0१७मध्ये सुरूवात होणे अपेक्षित होते; परंतु सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने खालापूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प रखडल्याचे जाणकारांचे मत आहे.>प्रकल्पाची वैशिष्ट्ये११ गावे ३५५0 हेक्टर जमीन २५ टक्के जमीन पायाभूत सुविधांसाठी१५ टक्के जमीन ग्रोथ सेंटर्ससाठी६0 टक्के जमीन विकासासाठीखालापूर स्मार्ट सिटी हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत येणारी ११ गावे नैनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य सरकारच्या मंजुरीसाठी तो लवकरच राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल.- प्राजक्ता लवांगरे-वर्मा, सहव्यवस्थापकीय संचालिक, सिडको