शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

खंबाटकी घाटात वाहतुकीची कोंडी !

By admin | Published: August 13, 2016 12:44 PM

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनांची कोंडी होत आहे.

आॅनलाईन लोकमत

सातारा, दि. १३ -  सलग तीन दिवस सुट्यांमुळे पुणे, मुंबईच्या पर्यटकांची पाऊले कास, बामणोली, महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनांची कोंडी होत आहे. वाहने गरम झाल्याने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. दुसरा शनिवार, रविवार व सोमवारी स्वातंत्र्य दिन या सलग सुट्या साज-या करण्यासाठी पुणे, मुंबईचे हौसी पर्यटक साता-याच्या दिशेने येऊ लागले आहेत. महाबळेश्वरमध्ये प्रचंड धुके अन् मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वर्षासहल अनुभवण्यासाठी ही नामी संधी आहे. कास पठारावर फुले उमलण्यास अद्याप सुरुवात झाली नसली तरी कास, बामणोलीतही मुसळधार पाऊस असून तेथील डोंगरात ठिकठिकाणी लहानमोठे धबधबे तयार झाले आहेत. तसेच देशातील सर्वात उंच वज्रराई धबधबे हौसी पर्यटकांना खुणावत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा परिणाम खंबाटकी घाटात दिसायला लागला आहे. घाटात सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे संधगतीने वाहतूक सुरू आहे. त्यातच चारचाकी गाड्यांचे इंजिन तापल्याने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.