लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी पहाटे खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ अपघातग्रस्त टँकर ओढून घेऊन जाताना उतारावर के्रन व टँकर दोन्ही उलटले. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल ७ तास विस्कळीत झाली होती़ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटच्या टँकरने पहाटे चारच्या सुमारास एका वाहनाला धडक दिली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन पूर्णपणे बंद झाल्या होत्या़ हा टँकर बाजूला काढण्यासाठी आयआरबी कंपनीचे पुलर मशिन व हायड्रोलिक के्रन मागविण्यात आली. क्रेनने हा टँकर ओढून बोरघाट पोलीस चौकीकडे नेत असताना उतारावर पुलर मशिनचा पट्टा तुटल्याने टँकर वेगात क्रेनला धडक देत रस्त्याच्या कडेला तर, क्रेन रस्त्याच्या मधोमध उलटल्याने वाहतूककोंडी झाली. क्रेनला बाजूला करण्यासाठी आणखी एक क्रेन मागविण्यात आली़ मात्र ती देखील रस्त्यात उलटलेली क्रेन बाजूला करताना आॅईलवरून सरकत गटारात गेली़ सर्व अपघातग्रस्त वाहने दहाच्या सुमारास बाजूला करण्यात आली़ या दरम्यान वलवण गावाजवळून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावर वळविल्याने लोणावळ्यात रांगा लागल्या होत्या.
खंडाळा घाटात ७ तास वाहतूक कोंडी
By admin | Published: January 08, 2015 1:48 AM