गुहागर (जि. रत्नागिरी) : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालात. राजीव गांधींना विरोध केला तरीही वाडगा घेऊन त्याच्या दारी उभे राहिलात यालाच लाचारी म्हणतात, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली.
शृंगारतळी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, अन्यायाविरोधात आम्ही दगडधोंडे हाती घेतो. जनता जनार्दनाला दिलेला शब्द कधीही खाली पडून देऊ नकोस हा मंत्र आजही पाळत आहे. २५ वर्षांपूर्वी युती केली आहे ती आजही कायम आहे. अयोध्या राममंदिराचा मुद्दा आम्ही आजही सोडलेला नाही. याबाबत जी-जी आवश्यक भूमिका असेल, ती घेत आहोत.नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखलरत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्यामध्ये हस्तक्षेप आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे उमेदवार नीलेश राणे व सोबत असलेल्या १६ जणांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.