डोंबिवली : येथील रहिवासी व प्रसिद्ध छायाचित्रकार नयन खानोलकर यांना ‘बीबीसी’तर्फे ‘फोटोग्राफर आॅफ द इयर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी जगभरातून ५० हजार अर्ज आले होते. त्यातून १० जणांची निवड करण्यात आली. इंग्लंडच्या राजघराणाच्या प्रतिनिधींच्या हस्ते लंडन येथील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ येथे हा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला. खानोलकर हे डोंबिवलीचे रहिवासी आहे’. २०१२ मध्ये त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते.मागील १० वर्षांत तीन भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. खानोलकर यांनी मुंबई आणि परिसरातील बिबळे यांचा प्रश्न छायाचित्रांद्वारे मांडला होता. त्यासाठी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सहकार्य लाभले होते. त्यातीलच ‘अर्बन लेपर्ड’ या छायाचित्रासाठी त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्या आरे कॉलनीत बिबट्यांचा वावर आहे, असे सांगितले जात होते, तेथे दीर्घकाळ प्रतीक्षा करून खानोलकर यांनी त्यांचा प्रवास टिपला. त्यातून त्यांची जीवनशैली समोर आली आणि परीक्षकांना ती भावली. (प्रतिनिधी)
खानोलकर यांच्या छायाचित्राला पुरस्कार
By admin | Published: November 04, 2016 3:31 AM